सरडे गावच्या सरपंच पदासाठी राहुल मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा!
गट नेते सुखदेव बेलदार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण गावाचे लक्ष; राजकीय गणिते बदलणार? सरडे (प्रतिनिधी): तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सरडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यामध्ये 'सरपंच' पदासाठी राहुल लाला मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा गावातील कट्ट्यांवर आणि गल्लीबोळांत रंगू लागली असून, यामुळे सरडे गावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल लाल मोरे हे राजे गटाचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सरडे गावचे गट नेते सुखदेव बेलदार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या संयमी आणि प्रभावी वक्तृत्वाने गावातील सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे करणारे एक आश्वासक नेतृत्व म्हणून राहुल मोरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वसामान्य जनतेतूनही चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. सुखदेव बेलदार काय निर्णय घेणार? गावकऱ्यांमध्ये तर्क-वितर्क सध्या सरडे गावात एकच प्रश्न चर्चिला जात आहे—गट नेते सुखदेव बेलदार ...