धारावीत शासकीय कर्तव्यात कसूर; वरिष्ठ लिपिकाविरोधात 'एनसीआर' दाखल

मुंबई:मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती होऊनही कर्तव्यावर हजर न राहता आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाविरोधात धारावी पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NCR) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी धारावी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा शासकीय नोकर खंडु छबन पाटील (वय ४१) यांनी सरकारतर्फे धारावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारीनुसार, धारावी येथील रहिवासी असलेले वरिष्ठ लिपिक दिगंबर मोकाशी यांची मतदार नोंदणी अधिकारी यांनी 'केंद्रस्तरीय अधिकारी' (BLO) म्हणून नियुक्ती केली होती. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी रीतसर सूचना देण्यात आली होती. तसेच या संदर्भात त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती.
परंतु, नोटीस मिळूनही दिगंबर मोकाशी हे कर्तव्यावर हजर झाले नाहीत. त्यांनी आपल्या शासकीय कर्तव्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ व हलगर्जीपणा केला. नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशांचे थेट उल्लंघन केल्यामुळे मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण झाला.
 

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते