क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सरडे, ता. फलटण: 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन सोमवार दि. 21 जून 2026 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल खलाटे सर होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

क्रीडाशिक्षक श्री. आप्पासाहेब वाघमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, शवासन तसेच प्राणायाम, अनुलोम-विलोम यांचे महत्त्व पटवून दिले. "रोज 20 मिनिटे योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते, एकाग्रता वाढते," असे त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. देवकाते सर, श्री. एजगर सर, श्री. पाटील सर व श्री. बेलदार सर यांनी विद्यार्थ्यांबरोबर योगाभ्यासात सहभाग घेतला. शिंदे मॅडम, विरणक मॅडम व मोरे मॅडम यांनी विद्यार्थिनींना योगाची शिस्त व नियम समजावून सांगितले.

मुख्याध्यापक श्री. खलाटे सर यांनी मनोगतात सांगितले की, "परीक्षेचा ताण, मोबाईलचा अतिवापर यामुळे मुलांची झोप व एकाग्रता बिघडते. योग हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने योगाला दैनंदिन जीवनाचा भाग करावे."

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी लेखनिक श्री. बेलदार, श्री. जाधव व श्री. भोईटे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाघमोडे सर यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते