सरडे येथील भावी सरपंच विशाल मोरे यांचा वाढदिवस युवा कार्यकर्त्यांच्या उत्साहात साजरा; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


वाढदिवस निम्मित 1000 वृक्ष लागवड करणार....
सरडे (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील सरडे गावचे डॅशिंग आणि लोकप्रिय युवा नेतृत्व, तसेच ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत असणारे भावी सरपंच विशाल मोरे यांचा वाढदिवस सरडे गावातील युवा कार्यकर्त्यांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून गावात विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विशाल मोरे यांनी आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाने आणि नेहमी सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याच्या वृत्तीमुळे सरडे गावात आणि परिसरात युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेची प्रचिती त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण गावाला आली.
वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच सरडे गावासह फलटण तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विशाल रणधीर मोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
हा वाढदिवस केवळ कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरूपात साजरा न करता, विशाल मोरे यांच्या संकल्पनेतून आणि सरडे गावातील युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला. यावेळी गावातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श घालून दिला.
वाढदिवसाच्या मुख्य सोहळ्याप्रसंगी बोलताना युवा कार्यकर्त्यांनी सांगितले की, "विशाल मोरे हे केवळ एक नाव नसून सरडे गावच्या विकासाची नवी आशा आहे. भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सरडे गावाचा कायापालट निश्चित आहे. त्यांच्या पाठीशी गावातील संपूर्ण तरुण वर्ग आणि ग्रामस्थ खंबीरपणे उभे आहेत."
या वाढदिवस सोहळ्याला सरडे गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि संपूर्ण युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आलेल्या सर्व हितचिंतकांचे आणि कार्यकर्त्यांचे विशाल मोरे यांनी मनःपूर्वक आभार मानले व गावाची सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही दिली.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा