पत्रकार प्रा. अमोल पवार यांना 'राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार

फलटण:
दैनिक सकाळचे राजाळे प्रतिनिधी आणि प्राध्यापक अमोल विठ्ठल पवार यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'भारतीय संविधान जनजागृती अभियान' अंतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठित “राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026”जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे फलटण शहर व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. अमोल पवार यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले आहेत. त्यांच्या याच उत्कृष्ट पत्रकारितेची आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करण्यासाठी या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शेलार यांनी दिली.
प्रा. अमोल पवार यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर आणले असून, सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते