सांगवी गावात आदर्श काम केल्याने सनी मोरे यांच्या सुनबाई ज्योती गौतम मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी
फलटण प्रतिनिधी - सांगवी हे गाव नीरा नदीच्या काठी असलेले सुंदर गाव या गावचे सरपंच संतोष उर्फ सनी मोरे तरुण अन् आपल्या गावचा विकास करण्यात अगदी यशस्वी झाल्याचे पहायला मिळते या मुळे विडणी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या सुनबाई सौ. ज्योती गौतम मोरे यांच्या उमेदवारीची मागणी करताच राजे गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषद विडणी गटातून शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली आहे. सांगवी ता.फलटण गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथे अतिशय सुंदर असे नियोजन करीत गावाचा सर्वांगीण विकास केला आहे.जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे तसेच गावातील रस्ते,गटार त्याचबरोबर स्वच्छता याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातू...