सरडे गावचे सुपुत्र प्रसाद नवनाथ वायफळकर यांची भारतीय लष्करात निवड
सरडे गावातील प्रसाद यांचे वडील नवनाथ वायफळकर यांनी प्रामाणिक पने काम करून कष्टाने मुलांना शिकवून घडवले आहे.
प्रसाद वायफळकर अत्यंत हलकीची परिस्थिती मधून या भरती प्रकिया साठी खूप म्हेणत चिकाटी आणि ध्येय समोर ठेवून या मध्ये पाऊल उचलले आहे.
सरडे येथील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रसाद वायफळकर याची भारतीय सैन्य दलात (Indian Army ) नुकतीच निवड झाली आहे. प्रसाद याने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.
सैन्य भरती प्रक्रियेत अपयश येत की नाही माहिती नसताना पहिल्या टप्प्यात , पण मनात 'फौजी' होण्याचं स्वप्न स्वस्त बसू देत नव्हतं. प्रसाद नियमित लवकरच पहाटे वाजता व्यायामला (रनिंग) जायचा, त्याला काही करुन सैन्यात भरती (Military Recruitment) व्हायचं होतं, त्यानं सैन्य भरतीचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु होते. आजअखेर त्यांचं सैन्य भरतीचं स्वप्न पूर्णात्वाला आलं आहे. त्याची जिद्द, मेहनत फळाला आली आहे.
प्रसाद नवनाथ वायफळकर यांच्या निवडीचा सार्थ अभिमान'
प्रसाद चे वडील मजूर काम करतात, तर आई मोलमजुरी करते. प्रसाद चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सरडे बंगला हायस्कूल क्रांतिसिंह हायस्कूल सरडे तर मुधोजी कॉलेज फलटण येथे शाळा मध्ये शिक्षण झाले . प्रसाद याच्या भरतीमुळे कामगिरीबद्दल सरडे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आम्हा सर्वांना प्रसाद या निवडीचा सार्थ अभिमान असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे.
प्रसाद वायफळकर सैन्य दलातील निवडीने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रसाद वायफळकर हे यश सहजासहजी मिळालेलं नाही, त्यानं यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आज माझ्या मुलाच्या निवडीनं ऊर अभिमानानं भरुन आला आहे. असे त्यांच्या आई-वडिलांची सांगितलं या पुढे त्यांची पहिल्यापासून इच्छा होती की, मी सैन्य दलात नोकरी करून देश सेवा करावी. आई-वडिलांचं स्वप्न आज खरे ठरलेले आहे. मला मोठं करण्यात माझ्या वडिलांचा गुरुजनांचा, ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच सैन्य दलात जाण्याचा विचार केल्यानंतर अविरत शारीरिक कसरत, परिश्रम व सातत्यपूर्ण सराव, यामुळंच मला यश मिळालं आहे. तसेच गुरुजनांचा देखील माझ्या यशात मोलाचा वाटा आहे.
सरडे गावातील लष्करात नाव हे आहेच परंतु अजून गावचे नाव उज्वल करण्याचा मनाचा तुरा या तरुणाच्या माध्यमातून घडला आहे.
Comments
Post a Comment