फलटण तालुक्यातील टाकळवाडे सहकारी सेवा सोसायटी मध्ये शेतकऱ्यांच्या जीवाची खेळ...?

टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. संस्था मध्ये औषधांची संस्था बनावट खतांची विक्री

टाकळवाडे, ता. फलटण, जि. सातारा गावातील टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. ही संस्था पतपुरवठ्याबरोबर खते, बी-बियाणे व औषधांची विक्री करणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये बनावट खतांची विक्री होत असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास काहीदिवसापुर्वी मिळाल्यानंतर कृषि विभागाकडुन सदर संस्थेच्या गोडावुनमधील खतांच्या साठ्यातून काही. सॅम्पल गोळा करुन ते परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवालामध्ये वरील संस्था बनावट खते विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दि. 08/01/2026 रोजी श्रीमती सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), नेमणुक फलटण तालुका कृषि विभाग, जि. सातारा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 16/2026, भा. न्या. सं. 2023 चे कलम 318(4), 3(5), रासायनिक खते (नियंत्रण) आदेश 1985 चे कलम. 12, 13, 19 (ए) (बी) (सी) (i)(ii)(iii)(vi), 19, 21 (ए), 22(बी), 35 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3(2) (ए), 7(i) (ए) (ii) अन्वये संस्थेच्या पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे सो व पोलीस निरीक्षक मा. संदीप जगताप सो यांचे मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. दिपक पवार हे तपास करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?