प्रा.अनिल जगताप यांचा प्रवेश समाज हित पाहून नागरिकांच्या प्रश्नांकडे वाटचाल !
शिवसेना सह इतर पक्षाच्या माध्यमातून मागासवर्गीय नागरिकांच्या प्रश्नासाठी रिंगणात उतरणार ?
गुणवरे गटातून हा यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव झाला असून या गटात राजकीय चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोखली गावच्या गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषद माजी सदस्य प्राध्यापक अनिल जगताप यांच्या पत्नी सौ .हेमलता अनिल जगताप सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक महिलांचा आणि तरुण वर्गाचा चांगला पाठिंबा लाभेल, अशी चर्चा ग्रामपातळीवर सुरू आहे.
यावेळी बोलताना म्हणाल्या म्हणाल्या ग्रामीण भागातील तालुक्यात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत अनेक मोठ्या समस्यांचा डोंगर आहे. शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. अतिवृष्टीने छोटे मोठे व्यावसायिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, नुकसानग्रस्तांना वंचित ठेवणे किंवा किरकोळ मदत देण्याचे काम शासन करत आहे. तालुक्यात उत्पादक शेतकरी वर्गासाठी प्रयत्न करण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत. अनेक शासकीय कार्यालयात खासगी लोकांची सुळसुळ असून, अनेक शासकीय योजनांचा लाभ गरजू पर्यंत मिळत नाही. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे.
सध्या अनिल जगताप यांच्या पत्नी सौ. हेमलता अनिल जगताप यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरताना दिसत आहे.विशेष म्हणजे, सौभाग्यवती विविध पदे असताना गावातील विकास कामांच्या बाबती कामांचा उच्चांक गाठला आहे गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय समीकरणे आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा लक्षात घेता निवडणूक लढवण्याचे आवश्यक असल्याने नागरिकांनी त्यांना सांगितले असल्याने या राजकारणामध्ये प्रा. अनिल जगताप ताकदीने उतरणार असल्याचे बोलले आहे
Comments
Post a Comment