Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा

Image
प्रतिनिधी:-जुबेर कोतवाल फलटण दि.२१| लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पालिका, मंगळवार पेठ फलटण येथील प्रशालेत भारतीय संविधान दिन व पत्रकार दिन साजरा करण्यात आला. भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. “वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्त्व घडते. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावून वाचन संस्कृती जपली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी पत्रकार प्रमोद सस्ते यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “भारतीय संविधान हा या देशाचा आत्मा असून लोकशाहीचा कणा आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार व कर्तव्य समजतात. विद्यार्थ्यांनी लहान वयातच संविधानाची ओळख करून घेणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवाद...

स्वाती लव्हाजी सावंत या गोंदवले.बू.गणातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडणूक रिंगणात

Image
पंचायत समिती गोंदवले.बु. या एस.सी आरक्षित जागेवर वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून सौ.स्वाती लव्हाजी सावंत उमेदवारी केली आहे. उमेदवार: गोंदवले.बु.गणातून स्वाती लव्हाजी सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा उमेदवारी अर्ज देखील छाननी मध्ये पात्र झाला आहे. गोंदवले.बु.गणातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत आहे असे बोलताना सौ.स्वाती लव्हाजी यांनी सांगितले   स्वाती सावंत या जाशी गावाच्या उपसरपंच असून त्यांना सामाजिक ,राजकीय,शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा अनुभव आहे.समाजातील विविध बांधवापर्यंत शासकीय योजना,लोकांचे मूलभूत प्रश्न सोडण्याचा अनुभव आहे.त्यांचे दिर मा.किरण सावंत हे 10 वर्षापासून बसपा या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक,प्रश्न सोडवत आहेत त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केलं आहे.त्यांच्या स्वाती सावंत या मोठ्या वहिनी आसून त्यांना मोठा मित्रपरिवार आहे शिवाय विकासकामे खेचून आणण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे गावात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत महत्वाचे म्हणजे काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्यायाला वाचा फ...

गुणवरे जिल्हा परिषद गटातून सौ ऋतुजा अभिजित जगताप यांची उमेदवारी घोषित

Image
गोखळी गावातील विकास कार्यांचा भागीदार अभिजित जगताप यांच्या पत्नी सौ ऋतुजा अभिजित जगताप यांना अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुणवरे गटातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी प्राप्त झाली आहे. अनुसूचित जाती महिला आरक्षण मर्यादेतून त्या या निवडणुकीला तोंड देत आहेत आणि घड्याळ चिन्हावर मतदान लढत आहेत. सौ ऋतुजा अभिजित जगताप यांचे पती अभिजित जगताप गोखळी गावचे माजी उपसरपंच होते. त्यांच्या कार्यकाळात गावातील विविध विकास कार्ये व सामाजिक योजना राबवण्यात आल्या होत्या. या अनुभवावर आधारित, सौ ऋतुजा जगताप गुणवरे गटातील जिल्हा परिषद पातळीवर विकास कार्यांना मुख्य लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प धारण करत आहेत. गुणवरे गटातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), रयत क्रांती संघटना आणि जय मल्हार क्रांती संघठनाकडून उमेदवारी जाहिरातीकरण झाले आहे.

विडनी जिल्हा परिषद गट: शिवसेनेकडून ज्योती गौतम मोरे यांना उमेदवारी, पूर्व भागात उत्साह

Image
विडनीत राजे गट वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ज्योती गौतम मोरे उभ्या विडनी जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने सौ. ज्योती गौतम मोरे यांना उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे पूर्व भागातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह निर्माण झाला आहे. राजे गटाचा या गटावर पारंपरिक वर्चस्व असले तरी ज्योती मोरे यांच्या निवडीने स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्योती गौतम मोरे या सांगवी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य राहिल्या असून, त्या काळात गावातील विविध विकास कामांना त्यांनी मोलाची साथ दिली होती. विडनी जिल्हा परिषद गटातही त्याचप्रमाणे कार्यरत राहू, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून, पूर्व भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

राजे गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद दादासो जावळे यांचा राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षात प्रवेश

Image
सांगवी येथील ग्रामपंचायत माजी सदस्य अरविंद दादासो जावळे यांनी आज राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षात. जाहीर प्रवेश केला आहे . फलटण कोरेगाव मतदार संघातील आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे.  आमदार सचिन पाटील राष्ट्रवादी ची नेते स्वरूपराजे खर्डेकर सह सांगवी येथील दोन्ही गटाचे दिग्गज राजकीय नेते मिळून विडणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण आणि गटाचा प्रचाराचा शुभारंभ सांगवी येथे कुलदैवत भैरवनाथ मंदिर प्रचार शुभारंभ भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या मध्ये सांगवी माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद दादासो जावळे यांनी राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षात प्रवेश केला आहे

सांगवी ग्रामपंचायतमध्ये 'संविधान अमृत महोत्सव' उत्साहात साजरा; सरपंच सनी मोरे यांच्या हस्ते ऐतिहासिक छायाचित्राचे अनावरण

Image
सांगवी: भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाचा जागर करण्यासाठी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सांगवी ग्रामपंचायत येथे 'संविधान अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात सामुदायिक संविधान वाचन आणि एका विशेष ऐतिहासिक छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. स्वखर्चातून ऐतिहासिक स्मृतींची जोपासना कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, सरपंच मा. संतोष (सनी) मोरे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ छायाचित्र. हे छायाचित्र डॉ. आंबेडकर संविधान समितीला अंतिम मसुदा सुपूर्द करत असतानाचे असून, ते आता सांगवी ग्रामपंचायत कार्यालयाची शोभा वाढवणार आहे. या छायाचित्राचे विधिवत पूजन आणि अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामुदायिक संविधान वाचन आणि संकल्प अनावरणानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) वाचन केले. "आम्ही भारताचे लोक..." या शब्दांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी बोलताना सरप...

प्रतीक्षा रोहन मोहिते यांना साखरवाडी जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी

Image
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी साखरवाडी जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी निश्चित केली आहे. उमेदवार: साखरवाडी या गटातून प्रतीक्षा मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. साखरवाडी येथील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत आहेत असे बोलताना सांगितले   साखरवाडी गाव हे जिल्हा परिषद गटात समाविष्ट असून त्यांचे पती रोहन मोहिते यांचा मोठा मित्रपरिवार आहे शिवाय विकासकामे खेचून आणण्यात त्यंच्या मोठा हातखंडा आहे गावात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत महत्वाचे म्हणजे साखरवाडी येथील बौद्ध समाजाला अजून बौद्ध मंदिर नसल्यामुळे तसेच काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे   

साखरवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेने मधून श्रीमती रूपाली ताई सरगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Image
प्रतिनिधी. नितीन जगताप  उमेदवारी जाहीर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी साखरवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने (राजे गट) आपली उमेदवारी निश्चित केली आहे. उमेदवार: या गटातून श्रीमती रुपाली सरगर यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. निवडणुकीचे महत्त्व: साखरवाडी हा सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त चर्चेत राहणारा गट असून, या ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळते. निवडणूक कार्यक्रम: राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली असून, जानेवारी २०२६ मध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

विडणी गट मध्ये राजे गटाच्या उमेदवाराला भाजपविरुद्ध कठीण स्पर्धेचे संकेत नागरिकांमध्ये चर्चा ?

Image
सांगवी गावातील राजनीतिक वातावरणात तणाव दिसून येत आहे. विश्वासराव भोसले साहेब यांच्या प्रभावशाली राजकीय उपस्थितीमुळे या क्षेत्रात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रबल मानले जात आहेत. तथापि, स्थानिक नागरिक असे सूचित करत आहेत की राजे गटाच्या शिवसेना गटकातून निवडलेला उमेदवार या मतदारसंघात लक्षणीय आव्हानांचा सामना करू शकतो का नाही ?. भाजपचे राजकीय वर्चस्व भारतीय जनता पार्टीने विडणी गटातून आपले उमेदवार घोषित केले आहेत. सांगवी गावातील भाजपचे नेतृत्व मजबूत आणि अनुभवी असल्याचे माहीत आहे, ज्यामुळे या पक्षाला स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. राजे गटाच्या शिवसेनामार्फत आणलेल्या उमेदवारांच्या भविष्यात अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. राजे गटाचे सांगवी गावचे नेते यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाचे नेत्रृत्व उमेदवार निवडीच्या बाबतीत अनिर्णियत राहिल्याचे स्थानिक लोकांचे मत आहे. विश्वासराव भोसले माजी सनदी अधिकारी या क्षेत्रातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व आहेत. गरिबांच्या कल्याणार्थ त्यांचे योगदान सर्वज्ञात आहे, ज्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव या निवडणुक...

देशसेवेचे स्वप्न साकार! सरडे गावच्या प्रसाद वायफळकर ची भारतीय लष्करात निवड; सरडे मध्ये जंगी सत्कार संपन्न

Image
भारतीय संविधान देऊन गौरव या सत्कार समारंभाचे वैशिष्ट्य सरडे (प्रतिनिधी): सरडे गावचा सुपुत्र प्रसाद वायफळकर याची भारतीय लष्करात निवड झाल्याबद्दल संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सरडे गावातील नागरिकांच्या वतीने प्रसाद आणि त्याच्या माता-पित्यांचा विशेष गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीय संविधान देऊन गौरव या सत्कार समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसाद आणि त्याच्या कुटुंबाला भारतीय संविधान प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सांगवी गावचे विद्यमान सरपंच सनी मोरे, 'साप्ताहिक सातारा सम्राट'चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद मोरे, आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल मोरे , राजू काजी यांच्या हस्ते भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त भारतीय राज्यघटनेचे संविधान देऊन हा सत्कार पार पडला. या सह सरडे गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन राजकीय दिग्गज राजकीय सामाजिक राजकीय , युवा खेळाडू, तसेच विविध मान्यवर सर्व उपस्थित होते.  यावेळी जागेच्या प्रश्नावर सकारात्मक पाऊल प्रसादच्या निवडीमुळे गावाचा नावलौकिक वाढला आहे. याच प्रसंगी, प्रसादच्...

फलटण तालुक्यात 'संविधान अमृत महोत्सवा'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष; राजकीय नेते केवळ पक्ष बांधणीत मग्न!

Image
जनतेनेच आता जागृत व्हावे, अधिकारी आणि नेते तुमचे हक्क सांगायला येणार नाहीत' : जय माने (सचिव, NDMJ फलटण)* फलटण (प्रतिनिधी): संपूर्ण देशात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, फलटण तालुक्यात मात्र या महत्त्वपूर्ण मोहिमेबाबत कमालीची उदासीनता पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश आणि शासन निर्णय असतानाही, तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये आणि राजकीय वर्तुळात संविधानाच्या जनजागृतीऐवजी केवळ राजकारणाच्याच चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस NDMJ या संघटनेचे फलटण सचिव जय भैया माने यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. *प्रशासकीय अधिकारी नेत्यांच्या 'दौऱ्यात' व्यस्त* सध्या फलटण तालुक्यात संविधान जनजागृतीचे कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र, तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना संविधानाचा प्रचार करण्याऐवजी राजकीय नेत्यांसोबत दौरे करण्यात अधिक रस असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संविधान अमृत...

क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे मध्ये राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

Image
ऑलम्पिक वीर स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव यांच्या १०१ वी जयंती निर्मित दिनांक १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून आज क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे मध्ये उत्साहात साजरा करण्यात आल फलटण तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सुप्रिया गाढवे मॅडम या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुखदेव बेलदार युथ असोसिएशन संस्था सरडे चे संचालक हे लाभले .फलटण तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री दशरथ लोखंडे सर , जिल्हा समन्वयक श्री उत्तम घोरपडे सर ,मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक श्री अजित गायकवाड सर ,हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भरत गरगडे सर सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून ऑलम्पिक वीर स्वर्गीय पै .खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री गरगडे सर यांनी केले शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यातालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सुप्रिया गाढवे मॅडम यांनी खेळ व खेळामुळे होणारे फायदे व त्यातून झालेले परिवर्तनतालुका क्रीडा अधिकारी पदाला घातलेली गवसणी याविषयी विद्यार्थ्य...

वनराई संस्थेच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे ? कोण लक्ष देणार

Image
वनराई संस्थेच्या माध्यमातून 1)अंबरवाडी 2) असवली 3) हरिपूर या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केले असल्याचे कळले आहे. वनराई संस्थेच्या माध्यमातून   जाळीबांध करण्याचे स्वरूप :- 100% दगड आणि जाळी वापरून केला जातो जाळी तसा न करता माती टाकून केला आहे आणि जाळीचे तुकडे टाकले आहेत एकपण बांधाचे मोजमाप बरोबर नाही सगळे मोजमाप बोगस आहेत अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे   - LBS  कामाचे स्वरूप - 100% पूर्णपणे दगड वापरून केला जातो पण तसे न करता आतमध्ये पूर्ण मातीने केला आहे आणि बाहेरून फक्त दिखाव्यासाठी वरून दगडाचा थर दिला आहे अशा चर्चा सुरू आहेत निकृष्ट दर्जाचे तत्काळ कामे थांबू अन्यथा लवकरच संघटनेच्या वतीने इशार करणारा असल्याचे काही सामाजिक कार्यकर्ते बोलले आहेत

वनराई संस्थेच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे ? कोण लक्ष देणार

Image
वनराई संस्थेच्या माध्यमातून 1)अंबरवाडी 2) असवली 3) हरिपूर या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केले असल्याचे नागरिकांच्या माध्यमातून कळले आहे. वनराई संस्थेच्या माध्यमातून   जाळीबांध करण्याचे स्वरूप :- 100% दगड आणि जाळी वापरून केला जातो जाळी तसा न करता माती टाकून केला आहे आणि जाळीचे तुकडे टाकले आहेत एकपण बांधाचे मोजमाप बरोबर नाही सगळे मोजमाप बोगस आहेत अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे   - LBS  कामाचे स्वरूप - 100% पूर्णपणे दगड वापरून केला जातो पण तसे न करता आतमध्ये पूर्ण मातीने केला आहे आणि बाहेरून फक्त दिखाव्यासाठी वरून दगडाचा थर दिला आहे अशा चर्चा सुरू आहेत निकृष्ट दर्जाचे तत्काळ कामे थांबवा? अन्यथा  लवकरच आंदोलन करणार  संघटनेच्या वतीने असा इशार करणारा असल्याचे काही सामाजिक कार्यकर्ते बोलले आहेत

सरडे गावचे सुपुत्र प्रसाद नवनाथ वायफळकर यांची भारतीय लष्करात निवड

Image
सरडे गावातील प्रसाद यांचे वडील नवनाथ वायफळकर यांनी प्रामाणिक पने काम करून कष्टाने मुलांना शिकवून घडवले आहे. प्रसाद वायफळकर अत्यंत हलकीची परिस्थिती मधून या भरती प्रकिया साठी खूप म्हेणत चिकाटी आणि ध्येय समोर ठेवून या मध्ये पाऊल उचलले आहे.  सरडे येथील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रसाद वायफळकर याची भारतीय सैन्य दलात (Indian Army ) नुकतीच निवड झाली आहे. प्रसाद याने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.  सैन्य भरती प्रक्रियेत अपयश येत की नाही माहिती नसताना पहिल्या टप्प्यात , पण मनात 'फौजी' होण्याचं स्वप्न स्वस्त बसू देत नव्हतं. प्रसाद नियमित लवकरच पहाटे वाजता व्यायामला (रनिंग) जायचा, त्याला काही करुन सैन्यात भरती (Military Recruitment) व्हायचं होतं, त्यानं सैन्य भरतीचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु होते. आजअखेर त्यांचं सैन्य भरतीचं स्वप्न पूर्णात्वाला आलं आहे. त्याची जिद्द, मेहनत फळाला आली आहे. प्रसाद नवनाथ वायफळकर यांच्या निवडीचा सार्थ अभिमान' प्रसाद चे वडील मजूर काम करतात, तर आई मोलमजुरी करते. प्रसाद चे प्राथमिक शिक्षण जिल्हा ...

फलटणच्या अधिकाऱ्यांचा 'संविधाना'ला विसर? समृद्ध मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियान 'मध्ये व्यस्त, अमृत महोत्सवाकडे दुर्लक्ष !

Image
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा - NDMJ संघटनेचा आक्रमक पवित्रा फलटण (प्रतिनिधी): संपूर्ण देशात आणि राज्यात 'संविधान अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आदेश असताना, फलटण तालुक्यातील प्रशासन मात्र या ऐतिहासिक उत्सवाबाबत कमालीचे उदासीन असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तालुक्यातील अधिकारी केवळ 'मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज' कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत धन्यता मानत असून, संविधानाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा त्यांना विसर पडल्याची टीका आता होऊ लागली आहे. याप्रकरणी 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) संघटनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 'संविधान अमृत महोत्सव' अंतर्गत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचे स्पष्ट परिपत्रक आणि आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, फलटणमधील शासकीय यंत्रणा सध्या केवळ मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज कार्यक्रमाच्या धावपळीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. संविधानामुळ...

प्रा.अनिल जगताप यांचा प्रवेश समाज हित पाहून नागरिकांच्या प्रश्नांकडे वाटचाल !

Image
मा. जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल जगताप यांच्या पत्नी सौ .हेमलता अनिल जगताप गुणवरे गटात मिळणार उमेदवारी..! शिवसेना सह इतर पक्षाच्या माध्यमातून मागासवर्गीय नागरिकांच्या प्रश्नासाठी रिंगणात उतरणार ? गुणवरे गटातून हा यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव झाला असून या गटात राजकीय चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोखली गावच्या गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  जिल्हा परिषद माजी सदस्य प्राध्यापक अनिल जगताप यांच्या पत्नी सौ .हेमलता अनिल जगताप सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक महिलांचा आणि तरुण वर्गाचा चांगला पाठिंबा लाभेल, अशी चर्चा ग्रामपातळीवर सुरू आहे. यावेळी बोलताना म्हणाल्या म्हणाल्या ग्रामीण भागातील तालुक्यात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत अनेक मोठ्या समस्यांचा डोंगर आहे. शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. अतिवृष्टीने छोटे मोठे व्यावसायिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, नुकसानग्रस्तांना वंचित ठेवणे किंवा किरकोळ मदत देण्याचे काम शासन करत आहे. तालुक्यात ...

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

Image
महादेव कोळी समाजाला संधी मिळावी.समाजाची आग्रही भूमिका. फलटण प्रतिनिधी: सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी अशी मागणी नुकतीच सौ.पायल अमोल पवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. राजे गटाच्या सांगवी गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज अनंत मंगल कार्यालय येथे पार पडल्या आहेत.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी आमदार दीपक चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विराजभय्या खराडे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी टाकळवाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल पवार यांच्या पत्नी सौ.पायल अमोल पवार यांना सांगवी गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी राजे गटाच्या वतीने उमेदवारी मिळावी व गणातील छोट्या गावाचा ही विचार करावा अशी गावातील नेते व कार्यकर्ते यांनी आग्रही मागणी केली आहे. सौ.पायल पवार या उच्चशिक्षित असून त्यांचे शिवाजी विद्यापीठातून M.A( राज्यशास्त्र) शिक्षण झाले आहे.त्यांचे पती प्रा.अमोल पवार यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. गावातील व पंचक्रोशीतील अनेक निराधार विधवा , परितक्त्या महिला यांना त्यांनी शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा आर...

फलटण तालुक्यातील टाकळवाडे सहकारी सेवा सोसायटी मध्ये शेतकऱ्यांच्या जीवाची खेळ...?

Image
टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. संस्था मध्ये औषधांची संस्था बनावट खतांची विक्री टाकळवाडे, ता. फलटण, जि. सातारा गावातील टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. ही संस्था पतपुरवठ्याबरोबर खते, बी-बियाणे व औषधांची विक्री करणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये बनावट खतांची विक्री होत असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास काहीदिवसापुर्वी मिळाल्यानंतर कृषि विभागाकडुन सदर संस्थेच्या गोडावुनमधील खतांच्या साठ्यातून काही. सॅम्पल गोळा करुन ते परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवालामध्ये वरील संस्था बनावट खते विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दि. 08/01/2026 रोजी श्रीमती सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), नेमणुक फलटण तालुका कृषि विभाग, जि. सातारा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 16/2026, भा. न्या. सं. 2023 चे कलम 318(4), 3(5), रासायनिक खते (नियंत्रण) आदेश 1985 चे कलम. 12, 13, 19 (ए) (बी) (सी) (i)(ii)(iii)(vi), 19, 21 (ए), 22(बी), 35 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3(2) (ए), 7(i...

विश्वासराव भोसले यांचे जवळकी राजाळे गावचे मा. सरपंच सचिन भालेराव यांना मिळणार विडणी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी ?

Image
राजाळे गावचे माजी सरपंच सचिन भालेराव यांच्या पत्नीला  विडणी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजाळे गावचे सनदी अधिकारी विश्वास राव भोसले साहेब यांच्या जवळीक आणि प्रामाणिक असणारे   सचिन भालेराव यांना तिकीट मिळण्याचे संकेत आहे की काय अशा चर्चा सुरू आहेत. ?