पोरकं होणं काय असतं, हे ज्याचं त्यालाच ठाऊक...'; विश्वजितराजेंचा तो Satus अन् फलटणकरांच्या डोळ्यांत पाणी!
फलटण: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरामुळे संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. अशा अत्यंत कठीण प्रसंगी फलटणचे युवा नेते मा. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी दाखवलेली संवेदनशीलता राजकारणाच्या पलीकडची माणुसकी अधोरेखित करणारी ठरली आहे. अजितदादांच्या संदर्भात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर माहिती आणि फोटोंचा महापूर आला आहे. मात्र, या चढाओढीत पीडित कुटुंबाच्या भावनांचा विचार कोणी करायचा? हा प्रश्न विश्वजितराजेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवरून जनतेला हात जोडून विनंती केली की, "आजच्या शोकांतिकेशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नका. यामुळे कुटुंबाच्या वेदना फक्त वाढतात." संवेदनशीलतेचा मापदंड राजकारणात गट-तट, विचार आणि पक्ष वेगळे असू शकतात. मात्र, वैयक्तिक आयुष्यात जेव्हा अशी मोठी शोकांतिका घडते, तेव्हा एक समाज म्हणून आपण किती प्रगल्भ आहोत, हे श्रीमंत विश्वजितराजेंनी दाखवून दिले आहे. "एका कुटुंबाचे दुःख हे केवळ त्यांचे खा...