विश्वनाथ मोरे स्मृती महोत्सव: जेजुरीत घडशी कलाकारांचा स्वरसंगम

जेजुरीत संगीतकार कैलासवासी विश्वनाथ मोरे यांच्या स्मरणार्थ घडशी कलारत्नांचा जल्लोष: २७ जानेवारीला महोत्सव

जेजुरीच्या जय मल्हार सांस्कृतिक हॉलमध्ये २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघतर्फे संगीतकार कैलासवासी विश्वनाथ मोरे साहेब यांच्या स्मृतीनिमित्त घडशी समाजातील लहानथोर कलारत्नांचा महोत्सव आयोजित होत आहे. हा कार्यक्रम श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मंगल वाद्यांमुळे घडशी समाजाला मिळालेल्या रामकृपेचे स्मरण करून देणारा असून, श्री किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळाही होणार आहे.

कार्यक्रमात जेजुरी नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप दिलीप दादा बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश शेठ मच्छिंद्र निकुडे, नगरसेवक समीर दादा मोरे, मंगेश घोणे, जेजुरी मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त प्रा. प्रवीण गायकवाड, मा. अमोल बेलसरे उपस्थित राहणार आहेत. घडशी समाजातील थोर कलाकारांच्या स्वरसंगमाने हा जल्लोष उंचावला जाणार असून, लहान कलाकारांपासून मोठ्यांपर्यंतचा सहभाग अपेक्षित आहे.

घडशी समाज हा आनंदाचा सोहळा असून, राज्य, जिल्हा पदाधिकारी, जेष्ठ सल्लागार व तरुण वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी झटत आहेत. सर्वांनी सकाळी १० वाजेपूर्वी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
असे आवाहन घडशी समाज संघ चे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल शंकरराव पवार यांनी केले

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?