शिवसेना पक्षाचे उमेदवार सौ ज्योती गौतम मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ विडणी मध्ये,
विडणी जिल्हा परिषद गटातून सौ ज्योती गौतम मोरे यांना उमेदवारी जाहीर केली असून, आज प्रचार शुभारंभ कार्यक्रम विडणी या गावापासून सुरू आहे. यावेळी गटातील सर्व मतदार राजांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .स्थानिक राजकारणात नव्या ऊर्मीला प्रेरणा देणारी असून, अनुसूचित जाती- (महिला) राखीव असलेल्या या गटात चुरशीची लढत अपेक्षित आहे. जिल्हा परिषद गट हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेला आहे. मागील निवडणुकीत येथे चुरशीची लढत रंगली होती, अनुसूचित जाती- (महिला) राखीव असल्याने शिवसेना पक्षाने यांना निवडले आहे. ज्योती मोरे हे सांगवी गावाच्या माजी सदस्य तर स्थानिक कार्यकर्ते सांगवी गावचे माजी सरपंच गौतम मोरे यांच्या पत्नी असून, त्यांचा पक्षातील सक्रिय सहभाग ओळखला जातो. पक्षाकडून ही उमेदवारी सामाजिक न्याय आणि बहुजन हिताच्या दृष्टीकोनातून जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घोषणेवर समाधान व्यक्त केले जात आहे. एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले, " सौ ज्योती मोरे यांसारख्या उमेदवारामुळे गटातील समस्या सोडवता येतील. आम्हाला दिशा देईल." य...