सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा
नीरा नदीकाठच्या सांगवी गावातील विद्यमान सरपंच संतोष उर्फ सनी मोरे यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) जाहीर सदस्यता घेतली. फलटण या ठिकाणी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. सांगवी गावचे तरुण सरपंच सनी मोरे हे गावाच्या विकासात यशस्वी ठरले आहेत. गावातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी त्यांना भाजपचा आधार हवा असल्याचे सांगितले जाते.त्यांच्या या प्रवेशामुळे विडणी जिल्हा परिषद गटातील, पंचायत समिती गणात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सांगवीसारख्या सुंदर गावातून भाजपला नवीन बळ मिळाले आहे.