ग्रामीण भागाचा आधारवड निखळला! सांगवी ग्रामपंचायत कार्यालयात अजितदादांना भावपूर्ण निरोप"
फलटण:
सांगवी: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सांगवी ग्रामपंचायत कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सांगवीचे सरपंच मा. संतोष (सनी )मोरे यांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अजितदादा म्हणजे प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि शब्दाला जागणारा नेता. "दादांनी दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ," अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक विकासपुरुष आणि उत्कृष्ट प्रशासक गमावला आहे.
सांगवी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यावेळी सरपंच संतोष (सनी )मोरे भावूक झाले होते. ते म्हणाले की, "अजितदादांनी नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. सांगवी गावाच्या विविध विकासकामांत त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सांगवी गावाने आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला...
Comments
Post a Comment