बांधकाम योजनांचा गैरवापर करुन फसवणाऱ्या दलाल एजंटापासुन सावध राहण्याचेकामगार आयुक्त कार्यालयाचे आवाहन

सातारा - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी करण्यात येऊन नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप केले जाते. मंडळामार्फत नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्याच्या योजना, आरोग्यविषयक योजना, सामाजिक सुरक्षा योजना व आर्थिक सहाय्याच्या योजना अशा एकूण ३२ विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून सदरच्या योजना निःशुल्क असल्याने लाभ थेट कामगारांच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो. प्रत्यक्षात या विविध कल्याणकारी योजनांचा आर्थिक गैरव्यवहार अनधिकृत संघटना, संस्था व दलालांमार्फत गैरप्रकार होत असून व लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याबाबतच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांनी अशा प्रकारची फसवणूक झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त, कार्यालय १५/१/अ/१, केशव सोना कॉम्प्लेक्स, रविवार पेठ, सातारा दुरध्वनी-०२१६२- २३३०८४ ई मेल- aclsatara@gmail.com या वरती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत संघटना, संस्था व दलाल, एजंट यांनी पात्र लाभार्थी बांधकाम कामगारांची फसवणूक केल्यास दक्षता पथकामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?