म्हसवड नगरपरिषद घरकुल योजनेच्या रखडलेल्या कामांमुळे नागरिकांच्या तक्रारी ?
म्हसवड घरकुल अर्ज रखडले; मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
म्हसवड नगरपरिषद गोरगरीब आणि अनुसूचित जातीतील नागरिकांना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने स्थानिक लोक आक्रमक झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर केले तरी कोणताही निर्णय घेतला गेला नसल्यामुळे नाराजी वाढत असून, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्याची तयारी सुरू झाली आहे.
म्हसवड नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुल सुविधा संबंधित कामे अत्यंत मंद गतीने चालू आहेत. शासकीय योजना असूनही मुख्याधिकारी यांच्याकडून न्याय मिळत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. विशेषतः अनुसूचित जातीतील लोकांना प्राधान्य देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे.
दहिवडी येथील केंद्रीय नामनिर्देशित सदस्य उपविभागीय दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी अर्ज सादर केले आहेत. या तक्रारींमध्ये घरकुल योजनेच्या अर्जांवर प्रलंबित निर्णय आणि गोरगरीबांना न्याय न मिळण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
नागरिक सांगतात, की मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लवकरच सातारा जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील इतर मुख्य अधिकारी आणि ग्रामपंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना निवेदन देणार आहोत. या प्रकरणाने म्हसवडमधील सामान्य लोकांमध्ये असंतोष वाढला असून, प्रशासकीय सुस्तीवर बोट ठेवले जात आहे.
Comments
Post a Comment