जिल्हा परिषद सातारा : राहुल गावडे यांची सदिच्छा भेट; ग्रामीण विकासाला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा

सातारा : सातारा जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल नेमचंद गावडे यांची आज सदिच्छा भेट घेतली असून, या भेटीद्वारे ग्रामीण विकासाच्या विविध योजनांना गती मिळवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. १ ऑक्टोबरपासून त्यांनी सातारा जिल्हा परिषद मध्ये पदभार स्वीकारला.

फलटण तालुक्यातील सुपुत्र राहुल गावडे साहेब हे कार्यक्षम अधिकाऱ्य म्हणून ओळखले जातात. नंदूरबारमधील यशस्वी कारकीर्दीनंतर सातारा जिल्हा परिषदेत त्यांची नियुक्ती झाली आहे. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या योजनांवर चर्चा केली. "सातारा जिल्हा परिषदेच्या प्रगतीसाठी मी पूर्ण वचनबद्ध आहे. नंदूरबारमधील अनुभव घेऊन येथील विकासकामांना नवीन चालना देणार," असे राहुल गावडे यांनी सांगितले.

या नियुक्तीचे सातारा जिल्हा परिषद साठी विशेष महत्त्व आहे. जिल्हा परिषद महाराष्ट्रात ग्रामविकासाच्या बाबतीत ९व्या स्थानावर असून, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांना गौरवित करण्यात आले होते. राहुल गावडे यांच्या येण्याने या यशाला पुढे नेलेजाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १५०० हून अधिक ग्रामपंचायती आणि लाखो ग्रामीण नागरिकांच्या विकासासाठी ही नियुक्ती मीलाचा दगड ठरणार आहे. सध्या जिल्हा परिषद सातारा मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग कार्यरत असून, राहुल गावडे हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय कार्यांना बळकटी देणार आहेत.

 आताच झालेल्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या योजनांना गती मिळेल आणि सातारा जिल्हा विकासाच्या पथावर अग्रेसर होईल. यावेळी साप्ताहिक सातारा सम्राट मुख्य संपादक गोविंद मोरे सह साई मजूर संस्था चे मालक राजाभाऊ जाधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?