जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बापूराव गावडे यांच्या नेतृत्वाला जनतेचे समर्थन

हेमलता ताई जगताप, वैशाली अतुल कांबळे यांच्यासह इतर शिवसेनापक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन :बापूराव गावडे 


गुणवरे गटातील गणातील निवडणुकीत शिवसेना पक्षातील उमेदवारांना जनतेचा विश्वास..!


गुणवरे प्रतिनिधी : पूर्व भागातील ओळखीचे नेते बापूराव गावडे यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा विशेष विश्वास आहे, चालू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत गुणवरे गटातील उमेदवारांना त्यांच्या माध्यमातून पसंती मिळतेय. बापूराव गावडे हे विकासरत्न सरपंच म्हणून ओळखले जातात आणि पूर्व भागातील जनतेच्या मनातील खरे नेते आहेत.

बापूराव गावडे यांनी संजय गांधी निराधार योजनेत अनेक महिलांना कोणताही पैसा न घेता मोफत सुविधा पुरवल्या आहेत. तर काहीना रेशन धान्य कार्ड असो की अन्य अडचणी सोडवल्या आहेत.
पूर्व भागातील लोक त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असून, ते सर्वसामान्यांचे विश्वासू नेते म्हणून पाहिले जातात. 
या निवडणुकीतील असणारे उमेदवार हे बापूराव गावडे यांच्या विश्वासातील आहेत, त्यामुळे नागरिकांनी इकडे-तिकडे न वळता त्यांच्याकडे आणि गुणवरे गटातील शिवसेना राजे गट उमेदवारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बापूराव गावडे यांनी मोजता येणार नाही एवढी विकासकामे केली असून, कोणत्याही नागरिकांना कधीही त्रास दिला नाही. अशा एकमेव नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राजे गटाचे उमेदवार हेमलता ताई जगताप, वैशाली अतुल कांबळे यांच्यासह इतर शिवसेनापक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?