पूर्व भागातील जिल्हा परिषदेसाठी बाशिंग बांधणारे उमेदवार: जनतेचा असंतोष

फलटण तालुक्यात बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या उमेदवारांवर नागरिकांचा सवाल: खरी ओळख काय?

फलटण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पूर्व भागातील निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार गुडघ्याला बांधलेल्या बाशिंगने तयारी करताना दिसत आहेत. हे बाशिंग बांधून तयारी करणारे काही उमेदवार गट आणि समाजातही अशाच प्रकारे फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे, तर सोशल मीडियावरही त्यांच्या अशा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

या भागात नेत्यांच्या गटांचा विचार न करता केवळ बाशिंग बांधून मांडवांकडे धाव घेणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. ज्यांनी यापूर्वी समाजहिताचा विचारच केला नाही, अशा व्यक्ती आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी करताना दिसत आहेत.  जिल्हा परिषद असो की पंचायत समिती पूर्व भागातील गटगटातील नेते बाजूला ठेवून बाशिंग बांधलेले उमेदवार मांडवाच्या दारी पोहोचले आहेत.

 जिल्हा परिषद पूर्व भागात चर्चेत असणारे उमेदवार डोक्याला सोडून गुड्यागला बाशिंग बांधून तयार असल्याचे पाहायला मिळत आहे. काही उमेदवार ना गटात नि समाजात असे बाशिंग बांधून तयार असल्याचे दिसू लागले आहे .   

सर्वसामान्य नागरिकांमध्ये या ट्रेंडवर संताप व्यक्त होत आहे. " जनतेचा पैसा लुबाडणाऱ्यांनी निवडणुकीचे स्वप्न पाहू नये," असे नागरिक सांगत आहेत. फलटण तालुक्यातील हे चित्र जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे.

क्रमश  भाग 1.. 


Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?