तब्बल 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मित्रांचा गेट-टुगेदर. क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल मध्ये जुन्या आठवणींना दिला उजाळा.

जुन्या मित्रांच्या भेटीच्या वेळी कधीकधी जीवनाच्या बदलणाऱ्या वाटा आणि विसरलेल्या आठवणींचा उजाळा घालण्याचा मोह होतो. अशाच क्षणांचा जतन करण्याचा एक सुंदर प्रयत्न फलटण तालुक्यातील सरडे येथील क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल मधील हा गेट-टुगेदर केवळ एक भेट नसून तो त्यांच्या मैत्रीच्या पुनरुज्जीवनाचा एक अविस्मरणीय क्षण होता.

तब्बल पंचवीस वर्षानंतर एकमेकांपासुन दुर गेलेले जुने मित्र एकत्र आले. आणी आनंदाचा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा केला. दहावी चे वर्ष संपल्यानंतर अनेक जण आपआपल्या मार्गानी शिक्षणासाठी निघून गेले होते. पण सोशल मिडियाच्या माध्यमातुन सर्वानी पुन्हा संपर्क साधला आणी एक विशेष गेट- टुगेदर आयोजित केला. या भेटीत वर्गातील गमतीं- जमती आणि शाळेतील दिवस या आठवणींना उजाळा देण्यात आला. काहिनी आपले जीवन प्रवास सांगितले तर काहिनी जुन्या आठवणीवर हसुन वेळ घालवला. तसेच सर्वानी आपले विचार मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली. क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल वर्ष 2000 मधील या १० वी च्या वर्गाचे स्नेहसंम्मेलन मोठ्या उत्सहात पार पडले. शालेय जीवनातील मित्र तब्बल पंचवीस वर्षानी एकत्रीत येत असल्याने शाळेतील बॅन्च वरती बसुन आनंद मावेत नव्हता. सकाळी शाळेत गाठी - भेटी व नंतर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी काहिनी शाळेतील किस्से सांगुन हास्यचा कल्लोळ केला. तर काहिनी जुन्या गुरुजनांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केले.क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे मुख्याध्यापक . भरत गरगडे सर
वर्गशिक्षक. देवकाते सर 
आदर्श शिक्षक . श्री शेंडे सर 
श्री खलाटे सर. श्री यजगर सर क्रीडाशिक्षक श्री वाघमोडे सर
महिला शिक्षिका भोसले मॅडम . भापकर मॅडम. मोरे मॅडम. आणि जाधव मामा सर्व शिक्षक उपस्थित होते 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. सलीम भाई शेख यांनी केले आणि अमोल शेंडगे यांनी आभार व्यक्त केले विद्यार्थ्यांची मनोगत त्यासोबत शिक्षक यांचे देखील मनोगत व्यक्त केले यावेळी माजी विद्यार्थी शहाजी पाटील.शरद भंडलकर, तात्याबा शेंडगे, सलीम शेख बाळासाहेब सुळ ,योगेश शेंडगे भरत शेंडगे ,अनिल बेलदार पांडुरंग कराडे ,विनोद भोसले ,नितीन जाधव ,अरविंद पाटील ,अमोल शेंडगे, बंदेनवाज शेख, सचिन शेंडगे,ज्ञानेश्वर बेलदार कृष्णा सदगर, गणेश बेलदार,सचिन जाधव , गजानन शिंदे. महंमद शेख ,चांद शेख,हनुमंत बेलदार,बापूराव दाभाडे ,केशव बेलदार,नानासाहेब डोंबाळे,अशोक बेलदार,सुरेंद्र भोसले,दयानंद सुरवसे ,रामा आडके 
दत्तात्रेय भंडलकर, तर मुलींमध्ये  
विद्या शेंडगे,सोनाली शेंडगे 
सुषमा धायगुडे ,प्रमिला होळकर 
जानकी भोसले इत्यादी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी मित्रांनी दरवर्षी एक गेट टुगेदर आयोजित करण्याचा संकल्प केला आणि या मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले. आणि या कार्यक्रमाची सांगता गोड जेवणाचा आस्वाद घेत झाली.

...........************...........

क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल शाळेचा तो पहिला दिवस गेट टुगेदर सोशल मीडिया माध्यमातून झाली 25 वर्षातून आठवण..!

 आठवणीत अजूनही बाईंचा तो प्रेमळ चेहरा, आणि मित्रांचा झाला सहवास. 

लहानग्या हातांनी धरलेला, आई-वडिलांचा हात. आजही आठवतो तो क्षण, जेंव्हा लागला शाळेचा ध्यास. 
खेळायचे, भांडायचे, आणि हसायचे मिळून. गुरुजींचा तो धाक, आणि अभ्यासाचा तणाव. गेली हातून
पुस्तकातली पाने, आणि वह्यांची पाने. आजही आठवतात ते दिवस, जेंव्हा होतो शाळेत दंग. आता आहे मोबाईल मध्ये तरी आठवतात ते दिवस...!


मित्रांच्या नकळत खाल्लेले त्यांचे डबे. अभ्यास केला नाही म्हणुन परिक्षेत काय लिहावे? यामुळे दणणायचे धाबे.

अभ्यास नाही म्हणून गुरुजींनी केली शिक्षा. पण त्यांच्यापासून मिळाली आहे आयुष्य जगण्याची आणि वागण्याची वेगळीच दिशा..!

शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेले रडु पाठीवर प्रेमळ हात फिरवत मित्रांचे ते सांगणे "आपण परत संसाराच्या जाळ्यामधून कधी भेटणार की नाही पण 25 वर्षातून गेट टुगेदर मधून आज भेटलो 


शाळेच्या आठवणी संपल्या आणि जुन्या आठवणीत रमता रमता 25 वर्ष झाले क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल माझी शाळा अजुनही पुन्हा पुन्हा आठवते डोळ्यातील आसवांवाटे परत ती पाझरते..!
...........................

विशेष लेखन 
क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल माजी विद्यार्थी 
मुख्य संपादक सातारा सम्राट 
गोविंद अरुण  मोरे




Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते