श्री. प्रीतम कोठारी व श्री. राहुल शहा यांचा जैन सोशल ग्रुप तर्फे सत्कार संपन्न!

फलटण- श्री कलिकुंड पार्श्वनाथ सिद्धातिशय क्षेत्र, कुंडलच्या कार्यकारिणी मध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल श्री प्रीतम कोठारी तसेच सातारा जिल्हा भाजपा जैन प्रकोष्ट फलटण प्रतिनिधी म्हणून निवड झाल्या बद्दल श्री. राहुल शहा यांचा जैन सोशल ग्रुप फलटण मार्फत अध्यक्ष श्री,श्रीपाल जैन व इव्हेंटचेअर पर्सन श्री. तुषार शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मोत्याची माळ व श्रीफळ देऊन उचित सत्कार करण्यात आला. 
    यावेळी JSG सचिव सौ. नीना कोठारी, माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र कोठारी,श्री.सचिन शहा, संगिनी फोरम माजी अध्यक्षां सौ. अपर्णा जैन JSG सहसचिव श्री. हर्षद गांधी, सौ.पूजा कोठारी, सौ. मुक्ती शहा तसेच बहुसंख्य जैन सोशल ग्रुप सदस्य उपस्थित होते. 
     यावेळी बोलताना जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन यांनी श्री.प्रीतम कोठारी व श्री.राहुल शहा यांच्या निवडीने फलटण ला बहुमान मिळाल्याचे सांगून दोघांचे अभिनंदन करूण भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा