क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे व्यवस्थापन समिती निवडीवरून चर्चांना उधाण; 'बेलदार' नावाभोवती संभ्रम?

सरडे (प्रतिनिधी) : 'शिक्षण हाच खरा विकासाचा मार्ग आहे' या ब्रीदवाक्याखाली कार्यरत असलेल्या सरडे येथील क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीवर मा. अशोक दिलीप बेलदार यांची सदस्य पदी निवड झाल्याचे अभिनंदन फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
सदर अभिनंदन फलकावरून स्थानिक पातळीवर विविध तर्कवितर्क आणि चर्चांना तोंड फुटले आहे. संस्थेच्या कामकाजात व समिती निवडीमध्ये इतरांना संधी मिळणार की केवळ ठराविक नावांचीच वर्णी लागणार, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. सर्वसामान्य व इतर घटकांतील नागरिकांनाही या संस्थेच्या प्रक्रियेत समान संधी व प्राधान्य मिळायला हवे, अशी भावना काही स्तरांतून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, व्यवस्थापन समितीच्या निवडीची नेमकी प्रक्रिया, नियमावली आणि इतर सदस्यांच्या निवडीबाबत अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. या निवडीमुळे शाळेच्या विकासासाठी नक्कीच हातभार लागेल की यावरून होणारी चर्चा अशीच सुरू राहणार, याकडे सरडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा