डॉ. वैष्णवी प्रदीप मोहिते यांचा 'राजे गट' शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांकडून सत्कार; मोहिते कुटुंबातील पहिल्या डॉक्टरचा गौरव

फलटण (प्रतिनिधी):
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते श्री. प्रदीप मोहिते यांची कन्या डॉ. वैष्णवी प्रदीप मोहिते हिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मोहिते कुटुंबातील पहिली डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि मोहिते कुटुंबातील पहिल्या डॉक्टरचा गौरव करण्यासाठी राजे गट शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष) पदाधिकाऱ्यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योती गौतम मोरे व फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मंगलताई बापूराव मोरे यांच्या हस्ते डॉ. वैष्णवी मोहिते हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
सांगवी गावातील मुलीने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी डॉ. वैष्णवीचे कौतुक केले आणि तिच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी श्री. गौतम मोरे, श्री. बापूराव मोरे, श्री. सावंत यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा