गट विकास अधिकारी अक्षय घावटे सह विविध मान्यवरांच्या हस्ते सातारा सम्राट दिवाळी अंकाचे प्रकाशन
फलटण (प्रतिनिधी) :
दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त फलटण तालुक्यात विविध सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांना उधाण आले असून, नुकतेच फलटण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (BDO) अक्षय घावटे, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जगताप यांचे पती अभिजित जगताप आणि पंचायत समिती सदस्य सचिन अभंग , पत्रकार शकील भाई यांच्या हस्ते सातारा सम्राट विशेष दिवाळी अंकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी, दिवाळी अंक ही मराठी संस्कृतीचा आणि साहित्यप्रेमाचा एक महत्त्वाचा ठेवा असल्याचे मत व्यक्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही छापील शब्दांचे आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी दिवाळी अंकांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक पातळीवरील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, सामाजिक जाणिवा आणि सांस्कृतिक परंपरांना वाचा फोडणाऱ्या वृत्तपत्र सातारा सम्राट अंकाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, साहित्यिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment