सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सोबत महत्त्वपूर्ण चर्चा संपन्न

दिनांक 2/11/2026 रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी यांच्या समस्यांवर बैठक संपन्न झाली.जिल्हाधिकारी यांच्यावतीने अप्पर उपजिल्हाधिकारी यांनी ही बैठक घेतली
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न मांडले यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत सदनिका द्याव्यात.
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने शासकीय नोकरी द्याव्यात. सफाई कामगारांचा फेरसर्वे करून पुनर्वसन करावे.सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका मधील सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मासिक वेतन द्यावे. सर्व स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमधील सफाई कर्मचाऱ्यांची यादी नावासह जिल्हा कार्यालयाला मागवून घ्यावी.या मागण्यांसह इतर मुद्दे मांडले यावर अध्यक्ष यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर नगरपालिका व नगर परिषदेचे प्रमुख महानगरपालिकांचे प्रतिनिधी यांनी अस्वच्छ काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यामध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्यामध्ये पारदर्शकता आणून अडचणी दूर करण्यासाठी सातत्य ठेवण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले. शासनाच्या व माननीय उच्च न्यायालयांच्या सर्व निर्देशांचे कठोर पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले. तसेच प्रलंबित सफाई कर्मचारी नियुक्ती व लाड पागे समितीमधील काही अडचणींवर देखील सखोल चर्चा झाली. सफाई कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी सर्व सदस्यांनी समन्वयाने सातत्यपूर्ण काम करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी सर्व विभागांचे प्रतिनिधी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सोनवणे मॅडम, ऍड रोहित एकमल्ली, निरंजन खंदारे हे उपस्थित होते.

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस
8484849480

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा