सरडे बंगला येथील उपशिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान! समाजाचा खरा शिल्पकार..!
फलटण,
फलटण तालुका शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. जि.प.प्राथ. शाळा सरडे बंगला येथील उपशिक्षक यांना त्यांच्या उत्कृष्ट व समर्पित अध्यापन कार्यासाठी हा सन्मान मिळाला.
आदरणीय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटण पंचायत समितीच्या शिक्षण सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सरडे बंगला शाळेच्या उपशिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी शिक्षकांचे समाजघटन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यातील योगदान अमूल्य असल्याचे सांगून, शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार काढले.
शुभेच्छांचा वर्षाव: शिक्षण सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकाचे अभिनंदन करत त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रेरणादायी सोहळ्यामुळे सरडे बंगला शाळा आणि संपूर्ण फलटण तालुक्यातून पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment