'आदर्श शिक्षिका सावित्रीमाई पुरस्कार' डॉ. वैशाली शिंदें यांना जाहीर.

फलटण / विशेष प्रतिनिधी:
सण-उत्सव म्हटलं की रोषणाई, फटाके, अवाजवी खर्च आणि दिखाव्याची चढाओढ हे आजच्या काळातील वास्तव बनले आहे. मात्र, या चकाकत्या दिखाव्यापेक्षा सामाजिक बांधिलकी श्रेष्ठ मानत, 'आयडियल इंटरनॅशनल स्कूल'च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. वैशाली विजय शिंदे यांनी घेतलेला एक निर्णय संपूर्ण फलटण तालुक्यात आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या वर्षी राज्यातील अनेक भागांत ओढावलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचे तीव्र भान ठेवून, त्यांनी यंदाची दिवाळी अत्यंत साधेपणाने व संवेदनशीलतेने साजरी करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
दिवाळीच्या काळात वैयक्तिक आनंद साजरा करताना होणारा अनावश्यक खर्च, दिखावा किंवा फोटोशूट यांसारख्या गोष्टींना पूर्ण फाटा देत, तोच संपूर्ण निधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आणि मुक्या पशुधनाच्या चारा-पाण्यासाठी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
'हीच आमची खरी दिवाळी!'
या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. वैशाली शिंदे म्हणतात, "वाजत-गाजत व मोठ्या प्रमाणावर खर्च करून आनंद साजरा करण्यापेक्षा, आज संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आमची आणि आमच्या संस्थेची खरी दिवाळी आहे." दुष्काळामुळे ग्रामीण भागात शेतकरी आणि त्यांचेूकडे असणारे मुके पशुधन अत्यंत बिकट आव्हानांचा सामना करत आहे. अशा कठीण प्रसंगी समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकाने संवेदनशील होऊन आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे.
 

शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवत असतानाच, समाजकार्याचा वसा कसा जोपासावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'आयडियल किड्स' आणि आयडियल इंटरनॅशनल स्कूलची वाटचाल होय. सर्वसामान्य व गरिबांच्या मनात हक्काचे आणि विश्वासाचे स्थान निर्माण करणारी ही संस्था आज प्रत्येकासाठी एक आदर्श बनली आहे.
शिक्षण क्षेत्राला समाजकार्याची जोड देत अविरत सेवा देणाऱ्या डॉ. वैशाली शिंदे मॅडम या खऱ्या अर्थाने नव्या पिढीसाठी 'आयडॉल' ठरल्या आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून व्यापक आणि प्रभावी सामाजिक कार्य करणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.


डॉ. वैशाली शिंदे यांच्या या धडाडीच्या, संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत, 'साप्ताहिक सातारा सम्राट' वृत्तपत्राच्या माध्यमातून दिवाळीनंतर त्यांना मानाचा 'आदर्श शिक्षिका सावित्रीमाई पुरस्कार' जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा संपादक मंडळाकडून करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या सावटाखाली असतानाही स्वतःचा आनंद बाजूला सारून समाजाच्या वेदनेला आपले मानणाऱ्या डॉ. वैशाली शिंदे यांच्या या उदात्त निर्णयाचे सर्व स्तरातून प्रचंड स्वागत होत असून, त्यांच्या या पाऊलामुळे इतरही अनेक संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा