माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सातारा, दि. :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील तब्बल ४९ गावे आणि २६५ वाड्या सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या बाधित भागातील ६२ हजार ८९२ लोकसंख्या आणि ४४ हजार ३४१ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
माण तालुक्यातील ३८ गावे आणि २२४ वाड्यांमधील ५१ हजार ७९६ नागरिक व ४१ हजार १४१ पशुधन टंचाईने प्रभावित झाले आहेत. येथे टंचाईवर मात करण्यासाठी १ शासकीय आणि ३२ खाजगी अशा एकूण ३३ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
खटाव तालुक्यातील ९ गावे आणि ३९ वाड्यांमधील ९ हजार ७२४ नागरिक व ३ हजार १५५ पशुधनाला ५ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
फलटण तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ३७२ लोकसंख्या व ४५ पशुधनाला १ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच एकूण १० विहिरी व १० बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा