बारामती तालुक्यातुन फलटण मध्ये बेकायदेशीर चक्री व्यवसायांचे जाळे; ऑनलाईन चक्री चालवणाऱ्या टोळीवरपोलीस प्रशासन काय कारवाई करणार?

फलटण: बारामती तालुक्यातून सुरू झालेल्या कथित बेकायदेशीर 'चक्री' व्यवसायाचे धागेडोरे आता सातारा जिल्हा आणि फलटण शहरापर्यंत पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या व्यवसायाचे सूत्रधार कोण..? अजून सहकारी सोबत असल्याचे आरोप केले जात असून, या नेटवर्कने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात विविध भागांत शिरकाव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे पैशांचे मोठे व्यवहार आणि ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मोठे मोठे (Transactions) झाल्याची माहिती समोर येत असून, या चक्री व्यवसायक यांच्या सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पायपसऱ्या करणाऱ्या गावात या टोळीमुळे स्थानिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांची दखल घेऊन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) व पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक (sp) साहेब प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस प्रशासन या प्रकरणी काय पावले उचलते आणि या आर्थिक व्यवहारांचे नेमके सत्य काय समोर येते, याकडे आता संपूर्ण पुणे व सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या रो... हित च्या ऑनलाईन चक्री मुळे अनेक कुटुंब बरबाद झाल्याचे कळत आहे 

भाग दोन सविस्तर

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा