महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या फलटण शाखा सहकोषाध्यक्षपदी अजय अहिवळे यांची निवड!

फलटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना (शाखा - फलटण नगरपरिषद, जि. सातारा) च्या सहकोषाध्यक्षपदी श्री. अजय सोनबा अहिवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेचे फलटण शाखा अध्यक्ष श्री. मुकेश विनायक अहिवळे यांनी नुकतेच त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान केले.
फलटण नगरपरिषदेमधील अधिकारी, कार्यरत कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांचे प्रलंबित व सर्वांगीण प्रश्न सोडवण्यासाठी दक्ष राहून कामकाज करावे, या उद्देशाने अजय अहिवळे यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना नवनिर्वाचित सहकोषाध्यक्ष अजय अहिवळे यांनी संघटना आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या विविध मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी पूर्ण उत्साहाने व सातत्याने कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजय अहिवळे यांच्या या निवडीबद्दल फलटण नगरपरिषदेचे कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा