साखरवाडी, खामगाव , विडणी, ग्रामपंचायत ने संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने आंदोलन ..!संविधान सप्ताह ग्रामसेवकांनी केला असेल..?
NDMG..संघटनेच्या वतीने लवकरच गट विकास अधिकारी यांना निवेदन देणार ..! ग्रामपंचायतीने संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने खळबळ; ‘बीडीओ’ना निवेदन देणार फलटण (प्रतिनिधी): देशभर ‘संविधान अमृत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीने या महोत्सवाकडे पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या या कथित उदासिनतेमुळे संविधानाप्रती असलेल्या कर्तव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, एन.डी.एम.जे. (NDMJ) संघटनेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासकीय आदेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संविधान अमृत महोत्सव व संविधान सप्ताह साजरा करणे बंधनकारक होते. मात्र, ग्रामपंचायतीने असा कोणताही कार्यक्रम राबवला नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. "प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवकांनी नक्की काय भूमिका बजावली? त्यांनी संविधान सप्ताह साजरा केला की नाही?" असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत. संविधानाचा सन्मान राखणे ही केवळ औपचारिकता नसून ते प्रत्येक शासकीय कार्यालयाचे कर्तव्य आहे. मोठ्या गावातील ...