Posts

फलटण तालुक्यात राजे गटाचा सामान्य कार्यकर्त्यांविषयी दुर्लक्षामुळे गटाची स्थिती चिंताजनक...?

Image
राजे गटाकडे कार्यकर्त्यांचा विश्वास कमी; इतर पक्षांमध्ये स्थलांतर सुरु   फलटण तालुक्यात राजे गटाच्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल दिसून येत आहे. येथील सामान्य कार्यकर्त्यांवर लक्ष न दिल्यामुळे अनेक नेते कार्यकर्ते भाजपसह इतर पक्षांकडे जाण्याच्या मार्गावर गेल्याचे दिसत आहेत. फलटणमधील राजे गट हे पूर्वीपासूनच शक्तिशाली मानले जात असले तरी त्यांनी मुख्यत: आपल्या गावठी समर्थकांवर भर दिला असून, सामान्य कार्यकर्त्यांना दुर्लक्ष केले आहे. या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून, राजकीय भविष्य काळजीत आहे. राजे गटाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांशी संवाद न ठेवता, स्वार्थी राजकारणाचा दाखला दिला आहे. सतत बदलणार्‍या राजकीय दबावामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण तरीही अनेक कार्यकर्ते अजूनही या गटाकडे आपली आशा बाळगून आहेत. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या गटाच्या कामकाजाचा परिणाम कसा होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्थानिक नागरिक आणि अनुभवी राजकारणी लोक यांचा असा विश्वास आहे की जर सामान्य कार्य...

बाबासाहेबांच्या भूमीवर महाडमध्ये अधिकाऱ्यांना लोकशाहीर डॉ.आण्णा भाऊ साठेंचा गौरव ग्रंथ सुपूर्द

Image
महाड येथे भव्य ऐतिहासिक चौदार तळे येथे स्मारक दर्शन घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली, जिथे रायगड जिल्ह्यातील महाड ,पोलादपूर, तालुक्याचे प्रमुख अधिकारी एकत्र आले होते. या कार्यक्रमात प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि एन.डी.एम.जे. संघटनेचे सदस्य उपस्थित होते. बैठकीमध्ये महाड व पोलादपूर या तालुक्यांमध्ये मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करणे. भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करणे, संविधानातील प्रमुख तरतुदी प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये आठ कलमी कार्यक्रम राबवणे, सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत. महाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विकास करणे, महाड चवदार तळ्याचा व परिसराचा विकास करणे, महाड राष्ट्रीय स्मारकामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे. घरकुलांना शासकीय जागा मिळवून देणे, मागासवर्गीयांच्या अतिक्रमणे नियमानुकूल करणे, अशा विषयांवर दीड तास चर्चा झाली. विशेषतः, या महाड जि रायगड नॅशनल दलित मुव्ह...

धार धार शास्त्रप्रमाणे असणार्‍या चीनी मांजा विकणाऱ्या व वापरणाऱ्या वर कठोर कारवाई भीम आर्मी

Image
फलटण : फलटण शहरा मध्ये धार धार शास्त्र प्रमाणे असणारा चीनी मांजा ज्यावर बंदी असताना सुध्दा विकला, वापरला , जातोय असे निदर्शनास येत असुन काळी दिवसावर आलेला नागपंचमी सण हा आनंदीत साजरा व्हावा हा चीनी मांजा मनुष्याला तर हानीकारक आहेच त्याच बरोबर पर्यावरणास, व पक्षी ,यांना सुध्दा हानीकारक आहे ., फलटण शहरामध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आपण सर्व फलटण मधील नागरीकांनी चीनी मांजा न वापरता साधा धागा वापरून यांधाची पंचमी पर्यावरण हानी विहिरी हीत करावी . त्याच बरोबर जो चीनी मांजा विकत आहे आणि वापरत आहे अशा नागरिकांना वर कठोर कारवाई करावी . अशी मागणी भीम आर्मी संघटना फलटण शहर पद अधिकारी व तालुका पद अधिकारी यांनी उप विभागीय दंड अधिकारी व पोलिस ठाणे यांच्या कडे केली आहे .त्या वेळी उपस्थित       फलटण शहर अध्यक्ष राहुल गुंजाळ, प्रतिक अहिवळे शहर सचिव , जिल्हा उप अध्यक्ष , लक्षण काकडे, मंगेश ननावरे ता. सचिव , आशुतोष डोईफोडे, विजय भोंडवे, ता, उपअध्यक्ष सुनील पवार ता अध्यक्ष अजित मोरे , यश अवघडे उपस्थित होते .

आ.रणजीत सिंह मोहिते पाटील यांचा सत्कार: घडशी समाजाच्या वतीने मानले आभार

Image
महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाने भाजपचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील विशेष सत्कार केला. घडशी समाजातील काही लोक संगीत क्षेत्रात कलाकार, गायक, वादक म्हणून ही परिचित असून हा समाज थोड्या थोड्चा स्वरूपात राज्यभरात विखुरलेला असल्याने या समाजास आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत  घडशी समाजाला न्याय देण्यासाठी विशेष मागास प्रवर्ग देण्यात यावा, तसेच या समाजाला अल्पसंख्यांक व आर्थिक दुर्बल घटक म्हणून घोषित करण्यात यावे, या समाजातील कलाकारांना आथिक सहाय्य मिळावे, राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये घडशी समाजातील लोकांची मानधनावर नियुक्ती करावी, तसेच या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकाना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, घडशी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, तसेच शासन दरबारी किंवा महामंडळावर प्रतिनिधित्व मिळावे अशा विविध मागण्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या समाजाकडून वारंवार शासनदरबारी करण्यात येत होत्या याची दखल घेवून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विध...

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील उपचारांमध्ये अडथळा;कर्मचाऱ्यांची अशिष्ट भाषा

Image
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काही पेशंटांना विशेष उपचार देताना अनावश्यक विलंब होत असल्याचा आणि औषधी विभागातील कर्मचाऱ्यांकडून अरेरावी भाषेत संवाद साधल्याचा आरोप समोर आला आहे. रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर धुमाळ यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय उद्धट वागणूक दाखवली गेली असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले आहे.  या ठिकाणी पेशंटांनी एक्स-रेसाठी विचारले असता, तंत्रज्ञांनी लाईट व्होल्टेज कमीत कमी असल्याचे सांगितले. यानंतर उच्च रक्तदाब असलेल्या पेशंटचा उपचार कसा करायचा याबाबत विचारल्यावर त्यांनी "कोणतीही गोळी घ्या" असे अकारण उत्तर दिले. याचसोबत गरीब लोक हॉस्पिटलवर त्रास देण्यासाठी कशाला येतात, अशा निंदक विधानही येथील कर्मचाऱ्यांकडून ऐकवण्यात आले.  याप्रकरणी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक दंड देऊन निलंबित करण्याची मागणी लवकरच निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेचे महासचिव ॲड. केवल उके आणि राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आंदोलन होण्याची चिन्हे आहेत.

फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचा उलंघन, अकॅडमी व्यवसाय उफाळले ; नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन होणार – सनी काकडे

Image
फलटणमधील शाळांमध्ये अकॅडमींपुढे पालक आणि विद्यार्थी आर्थिक ताणाखाली   फलटण शहरातील अनेक खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून अत्याधिक फी वसूल करण्यासाठी अकॅडमी बसवण्याची प्रथा वाढत चालली आहे. शासनाच्या अनुदानित शाळांमध्येही, या अकॅडमींचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळांचे संस्थापक आणि अकॅडमी मालक यांच्यात हे उद्योग आळस ठेवून विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक त्रास देत आहेत.   अशा अकॅडमी बिनमान्यता असून, त्यांचा अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या पद्धतीवर सरकारने ठरवलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचा गंभीर प्रकरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडतो आणि वर्गांमध्ये भेदभाव निर्माण होतो. विशेषतः एक ते दहावीत शिकणाऱ्या मुलांना मूलभूत गोष्टी समजत नसतानाही, त्यांच्यावर अकॅडमींची सक्ती केली जाते व अधिक शुल्क उकळवले जाते.   शाळांमध्ये शिक्षकांमध्ये शिक्षण देण्याच्या पद्धतीत कमतरता असल्यास, त्या शिक्षकांना हकालपट्टी करण्याऐवजी अकॅडमी चालवण्याचा धंदा सुरू ठेवला जा...

भीम आर्मी संघटने कडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फलटण मध्ये जलोष

Image
फलटण : पोलिस कोठडीत झालेल्या मृतृव प्रकरणी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश मिळाले. हायकोर्टाने संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हा निकाल आदेश देशात कायद्या पुढे समानता, समता दर्शवतो हे पाहता भीम आर्मी संघटनेने फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जलोष केला, त्याच बरोबर न्याय मिळवून देणारे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्व बहूजन समाजा कडून आभार मानले .न्यायालयाचे सुध्दा आभार मानले त्या वेळी भीम आर्मी संघटनेचे फलटण शहर व तालुका पद अधिकारी उपस्थित होते .   अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, प्रतिक अहिवळे, कुणाल अहिवळे, आशुतोष डोईफोडे, गणेश सुर्यवंशी, मंगेश ननावरे, यश अवघडे, विजय भोंडवे, सुरज भैलुमे, आधी उपस्थित होते..

रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान: कोरडवाहू शेतीला वरदान

Image
पिराचीवाडी (ता.फलटण) येथे शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा तंत्रज्ञानाच्या पेरणी प्रात्यक्षिकाची पहाणी केली. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, मुल स्थानी जलसंधारण व पीक उत्पादनात वाढीस उपयुक्त आहे. या आयोजनात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीशील शेतकरी अवीराज शिंदे यांच्या शेतावर प्रात्यक्षीकाचे आयोजन करण्यात आले.  पीराचीवाडी चे सरपंच दिपक सावंत यांनी या प्रसंगी बोलताना पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा फायदा होतो. सहाय्यक कृषि अधिकारी योगेश भोंगळे यांनी या तंत्रज्ञानाच्या फायद्यांवर प्रकाश पाडला. बीबीएफ पद्धतीमध्ये पाणी साचत नाही, शिवाय मुळे कुजण्याचा धोका कमी होतो. तणांच्या प्रादुर्भावात घट होते आणि मातीची धूपही कमी होते. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनातही वाढ होते. या वेळी प्रगतीशील शेतकरी योगेश सावंत, शुभम सावंत तसेच कृषी महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थी उपस्थित होते.

राजेंद्र कांबळे यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा समाजभूषण पुरस्कार जाहीर.

Image
फलटण, प्रतिनिधी,. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय विश्वकर्मा समाजभूषण पुरस्कार फलटण येथील गुणवंत कामगार श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, श्री .सुरेश केसरकर यांनी जाहीर केले .त्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 जयंतीचे अवचित साधून लवकरच कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र कांबळे यांना पुरस्काराने मोठ्या थाटामाटात वितरण करण्यात येणार आहे असे सुरेश केसरकर यांनी राजेंद्र कांबळे यांचे सामाजिक ,शैक्षणिक, कला, क्रीडा ,सहकार ,कामगार, सांस्कृतिक, साहित्य ,कवी ,गायन, अष्टपैलू आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान असल्याने निवड केली व जाहीर केले.

फलटण मधील बांधकाम कामगार एजन्सी दुकाने बंद करा 1रुपया फी हजारो रुपये घेण्याचे धंदे ... महादेव गायकवाड

Image
फलटण ..फलटण तालुक्यामध्ये गेले कित्येक दिवस बांधकाम कामगार यांची नोंदणी करण्याचे दुकाने प्रत्येक चौका चौकात स्थानिक ग्रामीण सह शहरी भागातील पुढाऱ्यांनी टाकले आहेत यामध्ये बांधकाम कामगार मजूर यांना सवलती देण्यापेक्षा त्यांच्या घामाचा पैसा खाण्याचे चित्र दिसत आहे.  मजूर वर्ग हा काम करून कष्ट करून पैसा यांच्या भूलथापांना यांच्या खादी कपड्यांना पाहून मजूर वर्ग घामाचा पैसा त्यांच्या खिशात भरत आहे. सर्वसामान्य नागरिक यांना बांधकाम कामगार या योजनेचा कोणत्याही स्वरूपातील माहिती नसल्याकारणाने हे बांधकाम कामगार संघटना कामगारांची लूट करत असल्याचे दिसत आहे कामगार संघटना आहेत परंतु कामगारांचे घामाचे पैसे खाणारे फलटण तालुक्यातून हटवा असे बोलले जात आहे आज पर्यंत फलटण मध्ये जेवढ्या बांधकाम कामगार संस्था आहेत यांच्या प्रत्येक पदाधिकारी किंवा ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगार मजूर यांना कार्ड दिले आहे अशा सर्व लोकांची चौकशी करणे गरजेचे आहे. या संघटनांनी खरंच ते त्यांनी बांधकाम कामगार मजूर आहेत की काय कित्येकांच्या खात्यावरती पैसे सरकारी गेले आहेत हे खरच मजूर आहेत का हे देखील पाहणे गरजेचे ...

फलटण तालुका अध्यक्ष अजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर अध्यक्ष राहुल गुंजाळ सह विविध पदाधिकारी यांची निवड

Image
फलटण - भीम आर्मी एकता मिशन संघटनेची फलटण शहर व फलटण तालुका कार्यकरणी आज कोळकी येथील फुले, शाहु आंबेडकर, सामाज मंदिर येथे सर्व महापुरुषांना आभिवादन करून जाहिर करण्यात आली . त्या वेळी फलटण तालुका अध्यक्ष अजित संभाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली तर प्रमुख उपस्थितीत म्हणून जिल्हा उप अध्यक्ष लक्ष्मण काकडे ,सुनील पवार तालुका उप अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नवीन पद नियुक्ती करण्यात आल्या.. शहर अध्यक्ष म्हणून राहुल हनुमंत गुंजाळ तर , प्रतिक प्रभाकर अहिवळे -शहर सचिव म्हणून तर आशुतोष जोतिराम डोईफोडे -शहर कार्याध्यक्ष तर कुणाल सुभाष अहिवळे - शहर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.  त्याच बरोबर मंगेश मारूती ननावरे -तालुका सचिव , म्हणून तर यश उदय अवघडे तालुका -संपर्कप्रमुख*, तर गणेश मधुकर सुर्यवंशी -सातारा जिल्हा कोष अध्यक्ष म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या त्या वेळी शरद यशवंत रणवरे हि उपस्थित होते. कोणत्याही नागरिकाला अडचण आली तर पदाधिकारी यांना कॉल करावे असे सांगितले आहे.     या वेळी राष्ट्रगीत व भारतीय संविधान प्रतीचे सामोहिक वाचन करण्यात आले..

शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी वसूल केल्यास महाविद्यालयांवर गुन्हासुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण

Image
सातारा .: सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-इबीसी-२००३/प्र.क्र.३०१/मावक-२ दिनांक-१ नोव्हेंबर, २००३ अन्वये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये, तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांना याबाबत वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या व शिष्यवृत्तीकरीता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून फी वसूलीबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा सूचना, सातारचे समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने संविधान दिंडीचे फलटणमध्ये स्वागत

Image
फलटण — देशभरातील सर्वच समाजाच्या हक्क आणि न्यायाच्या लढ्यात अग्रणी असलेल्या नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) संघटनेच्या वतीने नुकतीच फलटणमध्ये संविधान दिंडीचे स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन फलटण शहरातील विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यात करण्यात आले होते. संविधान दिंडी म्हणजे भारतीय संविधान वाचत, समाजातील असमानता, छळ आणि अन्यायाविरुद्ध जागरूकता वाढवण्याचा आणि राजकीय-सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा एक सक्रिय चळवळ आहे. या मुहिमेत देशभरातील विविध भागातून लोक सहभागी होऊन संविधानातील मौलिक अधिकार, समानता आणि सामाजिक न्यायाच्या प्रती आपले मत व्यक्त करत आहेत. फलटण येथे या दिंडीचे स्वागत करताना NDMJ नेत्यांनी संबोधित करत म्हणाले, “भारतीय संविधान आपल्या सर्वांसाठी समानतेची हमी देणारे दस्तऐवज आहे. परंतु, काही समुदायाला अजूनही अनेक स्तरांवर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. संविधान दिंडी ही आपण आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सामाजिक समतेसाठी एकत्र राहण्याची प्रक्रिया आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “फलटण...

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने अनिल वीर सन्मानीत

Image
सातारा : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार - २०२५ चा बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळ यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक, कोल्हापूर येथे सन्मानीत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,छ. शाहूंची प्रतिमा व पुस्तके असे होते.         राजर्षी शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आदी क्षेत्रातील उल्लेखनीय असे दखलपात्र कार्य पाहता हक्काचे मानकरी म्हणून पुरस्कारासाठी निवड समितीने एकमताने निवड केली होती.हा मानाचा पुरस्कार असल्याचे मान्यवरांनी विशद केले.ट्रस्टतर्फे अंतिमा कोल्हापूरकर,प्रमुख अमर कांबळे आदींनी स्वागत केले. प्रा.शोभा चाळके यांनी प्रास्ताविक केले.                  यावेळी "राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना..." या विषयावर जाहीर व्याख्यान देताना भरत रसाळे म्हणाले,"छ. शाहूंनी मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले होते...

वारकरी यात्रेत सामाजिक सेवाभाव: श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठानची अल्पोपहार वाटप सेवा

Image
प्रतिनिधी नितीन जगताप  साखरवाडी : वारकऱ्यांसाठी भक्तिमय आणि सामाजिक कार्य म्हणून दरवर्षी श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान साखरवाडी यांनी मोफत अल्पोपहार वाटप करण्याचे परंपरागत उपक्रम यावेळीही अखंड सुरु ठेवले आहे. या वर्षीही वारकरी परंपरेप्रमाणे भक्तिपूर्ण यात्रेत असताना, श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना गरम आणि पौष्टिक अल्पोपहार दिला आहे, ज्यामुळे वारकऱ्यांच्या भूक तृप्त होते आणि त्यांना मानसिक व शारीरिक बळकटी मिळते. वारकरी संप्रदायात वारकरी यात्रा ही एक अत्यंत आदर्श धार्मिक परंपरा असून, त्यात भक्तिमय व्रत, संयम आणि सामाजिक एकात्मता यांचा समावेश असतो. या यात्रेत अनेक किलोमीटर पायी चालत भक्त मानाप्रमाणे पंढरपूरकडे निघतात. या भव्य यात्रेत वारकऱ्यांना शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी नियमित आहाराची गरज असते. याच गरजा लक्षात घेऊन, श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान साखरवाडी यांनी वारकऱ्यांसाठी अल्पोपहार देण्याचा उपक्रम यशस्वीपणे चालवला आहे. या अल्पोपहार मोहिमेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, सुमारे पाच ते सात हजाराहून अधिक वारकऱ्यांनी मोफत अल्पोपहार घेतला आहे. प्रतिष्ठ...

सातारा जिल्ह्यात 'माकडताप'चा धोका: तज्ज्ञ डॉ विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आवाहन

Image
प्रतिनिधी - अभिषेक सरगर  सातारा : गेल्या काही वर्षांपासून कोकण विभागामध्ये 'माकडताप' म्हणजेच 'क्यासानूर फॉरेस्ट डिसीज' (KFD) या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजाराने आता पश्चिम घाटाच्या कोकण वनक्षेत्रात प्रवेश केला असून सातारा जिल्ह्याची ९७ किलोमीटरची पश्चिम सीमा कोकणाशी जोडलेली असल्यामुळे पाटण, जावळी आणि महाबळेश्वरसारख्या तालुक्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काय आहे माकडताप? माकडताप हा एक विषाणूजन्य आजार असून तो 'गोचीड' (ticks) नावाच्या किटकामुळे पसरतो. प्रामुख्याने माकडे आणि इतर वन्यजीवांमध्ये आढळणाऱ्या या गोचीडांचा संपर्क मानवाशी आल्यास हा आजार पसरू शकतो. विशेषतः पावसाळ्यात गोचीडांची संख्या वाढल्यामुळे वनक्षेत्रात काम करणारे शेतकरी, वन कर्मचारी आणि पर्यटक यांना जास्त धोका असतो. या आजाराची लक्षणे सुरुवातीला सामान्य तापासारखी दिसतात, पण वेळेवर उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांचे प्रशासनाला आवाहन फलटण येथील चव्हाणवाडी गावचे रहिवासी असलेले प्रसिद्ध डायबिटीस तज्ज्ञ, डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण (MBBS, MD MEDICINE...

जिल्हा परिषद ऑनलाईन बदलीत प्राथमिक शिक्षकांचा शक्कल लढवण्याचा प्रकार ?

Image
फलटण : फलटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंबंधी गैरव्यवहारांनी तालुका शिक्षणक्षेत्रात वादाचा धुरुळा उडाल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक बदल्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये, तालुक्यातील काही शिक्षकांनी विविध शक्कल लढवून आपले स्थान कायम ठेवण्यासाठी अनेक पळवाटा स्वीकारल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळेच सद्यस्थिती गडबडलेली आहे. ही बदली प्रक्रिया सध्या भरधाव गतीने सुरू असून, शिक्षकांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश लवकरच होणार असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. फलटण तालुक्याचा शैक्षणिक इतिहास आदर्श शिक्षकांमुळे समृद्ध आहे; प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारखे नामवंत शिक्षक आणि मॅक्लीन मावशीसारख्या परदेशी महिला यांनी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. मात्र, सध्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील गैरव्यवहारांच्या कारणाने तालुका वादग्रस्त झाला आहे. पारंपरिक ऑफलाईन बदल्यांऐवजी जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदल्या सुरु केल्या आहेत, ज्यामुळे बदल्यांत अधिक पारदर्शकता साधण्याचे प्रयत्न झ...

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

Image
सातारा दि. 26 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.      संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.      नीरा नदीतील स्नानानंतर सं...

पालखी सोहळ्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य हॉस्पिटल आरोग्य नियमांचे काटेकोर पालन आवश्यक ...वैभव गीते

Image
पालखी मार्गावर आरोग्य शिबिरांचे नियोजन आणि प्रचार वाढवावा, लोणंद _ लोणंद तालुका खंडाळा येथील महत्त्वाच्या आरोग्य योजनांतर्गत हॉस्पिटलांनी पालखी सोहळ्यात आरोग्य सेवा नियमांचे कठोर पालन करावे, असा आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. धर्मदाय व महात्मा फुले जनआरोग्य लोणंद येथील हॉस्पिटल साई ॲण्ड क्रिटीकेअर हॉस्पिटल , तसेच हॉस्पिटल सावित्री असे दोन धर्मदाय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत हॉस्पिटल आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चालणाऱ्या पालखी सोहळ्याच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी धोरणात्मक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. धर्मदाय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अंगीकृत असलेल्या साई ॲण्ड क्रिटीकेअर हॉस्पिटल आणि सावित्री हॉस्पिटल यांनी लोणंद येथे आरोग्य सेवा पुरवण्याचे सांगितले आहे. या सोबतच फलटण येथील लाईफ लाइन, निकोप हॉस्पिटल, उपजिल्हा व चिरजीवन हॉस्पिटल पालखी मार्गावर आरोग्य सुविधा देत आहेत. आळंदी पासून सुरू होणारी पालखी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतून जात असून, मार्गात विविध मुक्कामांच्या ठिकाणांवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून भक्ता...

आषाढी वारीत आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी अंगीकृत रुग्णालयांना आदेश ! आयोजन पाळले नाही तर आंदोलनाचा इशारा- वैभव गीते

Image
आषाढी वारी काळात पालखी मार्गावर आरोग्य शिबिरे घेऊन सर्व प्रकारचे उपचार मोफत द्यावेत... आषाढी वारीत आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी अंगीकृत रुग्णालयांना आदेश ! आयोजन पाळले नाही तर आंदोलनाचा इशारा- वैभव गीते  आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबत साताऱ्यात निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांच्या दैनंदिन आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन उपचारासाठी डॉक्टरांचा संपर्क क्रमांक संबंधितांना पुरवावा, असे आदेश दिले आहेत. अन्यथा तालुक्यातील फलटण येथे पालखी पोहोचताच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैभव गीते यांनी निवेदनाद्वारे दिला गेला आहे. आषाढी वारीत पालखी आळंदीतून प्रारंभ होऊन पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमधून प्रवास करताना अनेक ठिकाणी मुक्काम करत आहे. यामध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांनी आरोग्य शिबिर ठिकठिकाणी आयोजित करावेत, अशी सूचना झाल्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्राद्वारे देण्या...