पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला फलटणमध्ये गंभीर मारहाण


फलटण येथील एसटी स्टँडजवळील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका वाहन चालकाने शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यात दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित चालक पेट्रोल पंपावर स्वतःच आपल्या डिझेल वाहनात इंधन भरवत होता. तेव्हा कामगाराने त्याला इंधन भरण्याचे काम स्वतः करण्यास विरोध केला कारण त्याच्या मालकाने तसे मनाई केली होती. मात्र, चालकाने कामगाराच्या सूचना नाकारून शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. मारहाणीत कामगाराला कानाखाली आणि छातीवर जोरदार मार लागल्याने त्याच्या कानातून रक्त पडल्याचे समजते. या घटनेत कामगारांनी अनुचित वागणुकीविरुद्ध पोलिसांकडे अर्जाद्वारे अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अर्जाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा असे अर्जाद्वारे सांगितले आहे. कामगारांनी या प्रकारामुळे पेट्रोल पंप कामगारांवरील वाढत्या असमानतेविरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



Comments

Popular posts from this blog

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

फलटणमध्ये आ.दिपक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात ; तुतारीची माळ कोणाच्या गळ्यात ? चर्चांना उधान

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते