आ.रणजीत सिंह मोहिते पाटील यांचा सत्कार: घडशी समाजाच्या वतीने मानले आभार
घडशी समाजाला न्याय देण्यासाठी विशेष मागास प्रवर्ग देण्यात यावा, तसेच या समाजाला अल्पसंख्यांक व आर्थिक दुर्बल घटक म्हणून घोषित करण्यात यावे, या समाजातील कलाकारांना आथिक सहाय्य मिळावे, राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये घडशी समाजातील लोकांची मानधनावर नियुक्ती करावी, तसेच या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकाना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, घडशी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, तसेच शासन दरबारी किंवा महामंडळावर प्रतिनिधित्व मिळावे अशा विविध मागण्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या समाजाकडून वारंवार शासनदरबारी करण्यात येत होत्या याची दखल घेवून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत याविषयी आवाज उठवला
अधिवेशनात त्यांनी घडशी समाज संघाच्या विषयांची योग्य मांडणी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात त्यांना आभार पत्र देण्यात आले. सोबतच प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब पवार शिंगणापूर यांनी त्यांना शंभुमहादेवाची प्रतिमा, दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी घडशी समाज संघाच्या विषयांची मांडणी केल्यानंतर हा सत्कार केला गेला. त्यांच्या या कार्याने समाज संघाला नैतिक जबाबदारी वाटली आणि त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे अध्यक्ष अनिल शंकर पवार, समाजसेवक जगन्नाथ धुमाळ, सर संचालक रामभाऊ भोसले, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब पवार, सोलापूर जिल्हा माजी उपाध्यक्ष धनंजय भोसले, महाराष्ट्रातील नामांकित डीजे आकाश फलटण, अकलूज मधील जेष्ठ कार्यकर्ते जितेंद्र धुमाळ, फलटण तालुका अध्यक्ष ओंकार पवार, सचिव ओंकार साळुंखे, महाराष्ट्र राज्य संचालक प्रितम धुमाळ, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष लखन धुमाळ आणि सभासद गणेश धुमाळ या सर्वांनी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील साहेबांचे आभार मानले
Comments
Post a Comment