फलटण उपजिल्हा रुग्णालयातील उपचारांमध्ये अडथळा;कर्मचाऱ्यांची अशिष्ट भाषा
या ठिकाणी पेशंटांनी एक्स-रेसाठी विचारले असता, तंत्रज्ञांनी लाईट व्होल्टेज कमीत कमी असल्याचे सांगितले. यानंतर उच्च रक्तदाब असलेल्या पेशंटचा उपचार कसा करायचा याबाबत विचारल्यावर त्यांनी "कोणतीही गोळी घ्या" असे अकारण उत्तर दिले. याचसोबत गरीब लोक हॉस्पिटलवर त्रास देण्यासाठी कशाला येतात, अशा निंदक विधानही येथील कर्मचाऱ्यांकडून ऐकवण्यात आले.
याप्रकरणी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक दंड देऊन निलंबित करण्याची मागणी लवकरच निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेचे महासचिव ॲड. केवल उके आणि राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आंदोलन होण्याची चिन्हे आहेत.
Comments
Post a Comment