रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान: कोरडवाहू शेतीला वरदान
पिराचीवाडी (ता.फलटण) येथे शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा तंत्रज्ञानाच्या पेरणी प्रात्यक्षिकाची पहाणी केली. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, मुल स्थानी जलसंधारण व पीक उत्पादनात वाढीस उपयुक्त आहे. या आयोजनात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीशील शेतकरी अवीराज शिंदे यांच्या शेतावर प्रात्यक्षीकाचे आयोजन करण्यात आले.
पीराचीवाडी चे सरपंच दिपक सावंत यांनी या प्रसंगी बोलताना पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा फायदा होतो. सहाय्यक कृषि अधिकारी योगेश भोंगळे यांनी या तंत्रज्ञानाच्या फायद्यांवर प्रकाश पाडला. बीबीएफ पद्धतीमध्ये पाणी साचत नाही, शिवाय मुळे कुजण्याचा धोका कमी होतो. तणांच्या प्रादुर्भावात घट होते आणि मातीची धूपही कमी होते. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनातही वाढ होते. या वेळी प्रगतीशील शेतकरी योगेश सावंत, शुभम सावंत तसेच कृषी महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment