नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यात नव नवीन पदाधिकारी नेतृत्व नव्याने घडविण्याची तयारी ...वैभव गीते
फलटण ..सातारा जिल्ह्या सह फलटण तालुक्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचार वाढ होत असल्याने पदाधिकारी निवड करण्याचे ठरवले आहे. अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेसाठी सातारा जिल्ह्यासह फलटण आणि विविध तालुक्यांत नवे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही संघटना केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात अन्याय अत्याचार झालेल्यांवर आवाज उठवणार ऐक मेव संघटना आदरणीय ॲड. केवल उके यांच्या नेतृत्वाखाली सतत कार्यरत आहे. गावोगावी, गटागटात अन्याय अत्याचाराची घटना दिसून येत असताना, संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची गरज सतत भासली आहे. या सर्वांमध्ये समन्वय साधून, अन्याय प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यासाठी उपक्रम घेण्याची तयारी आहे.
वैभवजी गीते, संघटनेचे राज्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली , त्यांनी येत्या काही दिवसात सातारा-फलटण परिसरात परिसंवाद आणि मुलाखतीद्वारे स्पष्ट केले आहे, जातिभेद, अत्याचार, अन्याय या समस्यांविरुद्ध लढण्यासाठी जे युवक सज्ज असतील, त्यांनी जय माने या माध्यमातून (८०१०९९७६३३) संपर्क साधावा. प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक पातळीवर सक्रिय सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या गटाची निवड झाल्यानंतर, संघटनेची कारवाई अधिक प्रभावी आणि सखोल होईल, हे त्यांचे विश्वासाचे बोलणे आहे.
संघटनेच्या मागणीनुसार, सकारात्मक बदलासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे या साठी त्यात अन्याय अत्याचार प्रतिबंध, स्थानिक नेतृत्व, कायद्याची अंमलबजावणी, हक्कांची ओळख, युवा सहभाग आणि वृत्तपत्रीयता या घटकांचा सहभाग राहणारा आहे
अन्याय विरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांसाठी संघटनेत सहभागाची मोठी संधी तसेच
दलित अधिकारासाठी तालुक्यात नवे नेतृत्व, संपर्काचं आवाहन
केले आहे. पदाधिकाऱ्यांसाठी नवे पर्व ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी संपर्क करावा असे सांगितले आहे
Comments
Post a Comment