राजेकरून बंगला शाळेच्या शेजारी दारू विक्री;
पोलीस पाटीलवरही गंभीर आरोप ; पोलिस पाटील निष्क्रीय, दारूच्या धंद्याविरुद्ध नागरिकांचा संताप
सांगवीच्या राजेकरून बंगला येथे जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी दारू विक्री सुरू असलेल्या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शाळेच्या अगदी जवळ या दारूच्या धंद्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सांगवी गावातील पोलीस पाटील चोरीछिप्या हप्ते घेऊन झोपेत असल्याचा आरोपही समोर आला आहे, जो या प्रकरणाची गंभीरता दर्शवतो. तसेच या दारू विक्रीत कोणकोण जिवंतपणे जवळीक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कडक कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पोलीस विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे बोलले आहे, सांगवी गावचे पोलीस पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. जर पोलीस पाटील यांनी आपल्या उच्चपदस्थांपर्यंत गावातील दारू विक्रीचा अहवाल दिला नाही, तर त्यांच्याविरुद्धही कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे ?
या घटनेवर तत्काळ पोलीस विभागाने लक्ष देणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांनी देखील आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दारू विक्री बंद केली नाही तर संबंधित अधिकार्यांविरुद्ध निवेदन दिले जाण्याची तयारीही सुरु आहे.
Comments
Post a Comment