जिल्हा परिषद ऑनलाईन बदलीत प्राथमिक शिक्षकांचा शक्कल लढवण्याचा प्रकार ?

फलटण :
फलटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंबंधी गैरव्यवहारांनी तालुका शिक्षणक्षेत्रात वादाचा धुरुळा उडाल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक बदल्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये, तालुक्यातील काही शिक्षकांनी विविध शक्कल लढवून आपले स्थान कायम ठेवण्यासाठी अनेक पळवाटा स्वीकारल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळेच सद्यस्थिती गडबडलेली आहे. ही बदली प्रक्रिया सध्या भरधाव गतीने सुरू असून, शिक्षकांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश लवकरच होणार असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

फलटण तालुक्याचा शैक्षणिक इतिहास आदर्श शिक्षकांमुळे समृद्ध आहे; प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारखे नामवंत शिक्षक आणि मॅक्लीन मावशीसारख्या परदेशी महिला यांनी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. मात्र, सध्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील गैरव्यवहारांच्या कारणाने तालुका वादग्रस्त झाला आहे. पारंपरिक ऑफलाईन बदल्यांऐवजी जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदल्या सुरु केल्या आहेत, ज्यामुळे बदल्यांत अधिक पारदर्शकता साधण्याचे प्रयत्न झाले आहेत.  

परंतु, स्थानिक शिक्षकांना तालुक्याबाहेर जाण्याची इच्छाअभावी, ते आपल्या बदलीसाठी वेगवेगळ्या शक्कल जोडणी करून आपले अधिकार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक वर्षे त्यांनी तालुक्यात ठाण मांडले असून वेगवेगळे उद्योगही करत आले आहेत. त्यांच्या या वर्तनामुळे ही बदल्या प्रक्रिया गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे. 
या अनियमितता आणि गैरव्यवहारांविरूद्ध लवकरच चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होऊ लागली आहे .चौकशी झाल्यास लवकरच शिक्षक बदल्यांमध्ये पारदर्शकतेसाठी आणखी आव्हाने उभी राहणार असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागल्या आहेत.

क्रमशः ...भाग - 1

Comments

Popular posts from this blog

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

फलटणमध्ये आ.दिपक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात ; तुतारीची माळ कोणाच्या गळ्यात ? चर्चांना उधान

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते