पालखी सोहळ्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य हॉस्पिटल आरोग्य नियमांचे काटेकोर पालन आवश्यक ...वैभव गीते
पालखी मार्गावर आरोग्य शिबिरांचे नियोजन आणि प्रचार वाढवावा,
लोणंद _ लोणंद तालुका खंडाळा येथील महत्त्वाच्या आरोग्य योजनांतर्गत हॉस्पिटलांनी पालखी सोहळ्यात आरोग्य सेवा नियमांचे कठोर पालन करावे, असा आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. धर्मदाय व महात्मा फुले जनआरोग्य लोणंद येथील हॉस्पिटल साई ॲण्ड क्रिटीकेअर हॉस्पिटल , तसेच हॉस्पिटल सावित्री असे दोन धर्मदाय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत हॉस्पिटल आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चालणाऱ्या पालखी सोहळ्याच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी धोरणात्मक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
धर्मदाय व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अंगीकृत असलेल्या साई ॲण्ड क्रिटीकेअर हॉस्पिटल आणि सावित्री हॉस्पिटल यांनी लोणंद येथे आरोग्य सेवा पुरवण्याचे सांगितले आहे. या सोबतच फलटण येथील लाईफ लाइन, निकोप हॉस्पिटल, उपजिल्हा व चिरजीवन हॉस्पिटल पालखी मार्गावर आरोग्य सुविधा देत आहेत. आळंदी पासून सुरू होणारी पालखी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतून जात असून, मार्गात विविध मुक्कामांच्या ठिकाणांवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून भक्तांना मोफत उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. यासाठी आयुष्मान भारत ई-कार्ड व ई-केवाय नोंदींचा विस्तार करणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले गेले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांनी १९ जून २०२५ रोजी सुरू होणाऱ्या आषाढी वारीच्या कालावधीत पालखीच्या आरोग्य व्यवस्थापनाचे नियोजन व्हावे, यावर भर दिला आहे. तसेच, पालखीमार्गावर ताण निर्माण होऊ शकणाऱ्या ठिकाणी वेळेवर आरोग्य शिबिर आरोग्य सेवांची योग्य पूर्तता करावी, असेही त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. लोणंद व तरडगाव येथील हॉस्पिटल व शिबिरांबाबत वैभव गिते यांच्यामध्यमातून पाहणी केली असता, कुठेही आरोग्य शिबिराचे बॅनर किंवा तयारी दिसली नाही, जेणेकरून लवकरात लवकर सुधारणा करावीचांगले नियोजन करावे आरोग्य विभागाचे नियम पाळावे, अंकिकृत हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आरोग्य विषयी वारकऱ्यांचे आरोग्य विषयी हाल झाले तर सहन करणार नाही असे वैभव गीते हे बोलले आहेत,
पालखी सोहळ्याच्या आरोग्य सुविधा योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर व सदस्य सहभागी झाले होते. फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जर्मन टेंटचीही पाहणी केली गेली. यावेळी वैभव गीते (राज्य सचिव, NDMG), महादेव गायकवाड दक्षता नियंत्रण समिती उपविभाग फलटण , ॲड नवनाथ भागवत दक्षता नियंत्रण समिती उपविभाग फलटण , गोविंद मोरे केंद्रीय नामनिर्देशित सदस्य, आणि पत्रकार सुशील गायकवाड यांसह इतर उपस्थित होते.
Comments
Post a Comment