आषाढी वारीत आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी अंगीकृत रुग्णालयांना आदेश ! आयोजन पाळले नाही तर आंदोलनाचा इशारा- वैभव गीते


आषाढी वारी काळात पालखी मार्गावर आरोग्य शिबिरे घेऊन सर्व प्रकारचे उपचार मोफत द्यावेत...

आषाढी वारीत आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी अंगीकृत रुग्णालयांना आदेश ! आयोजन पाळले नाही तर आंदोलनाचा इशारा- वैभव गीते 

आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबत साताऱ्यात निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांच्या दैनंदिन आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन उपचारासाठी डॉक्टरांचा संपर्क क्रमांक संबंधितांना पुरवावा, असे आदेश दिले आहेत. अन्यथा तालुक्यातील फलटण येथे पालखी पोहोचताच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैभव गीते यांनी निवेदनाद्वारे दिला गेला आहे.

आषाढी वारीत पालखी आळंदीतून प्रारंभ होऊन पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमधून प्रवास करताना अनेक ठिकाणी मुक्काम करत आहे. यामध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांनी आरोग्य शिबिर ठिकठिकाणी आयोजित करावेत, अशी सूचना झाल्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे. साताऱ्यातील मार्गावर २६ जून रोजी वाल्हे ते लोणंद, २७ जून लोणंद ते तरडगाव, २८ जून तरडगाव ते फलटण, २९ जून फलटण ते बरड आणि ३० जून बरड ते नातेपुते या ठिकाणी आरोग्य शिबिरे होणार आहेत.

 उपजिल्हा रुग्णालय फलटण यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन डी एम जे संघटनेचे पदाधिकारी व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अद्यकृत रुग्णालय तसेच धर्मादाय रुग्णालय यांचे प्रमुख यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेण्यात आली होती.
मीटिंगमध्ये शिबिर आयोजित करावी अशी मागणी वैभव तानाजी गिते NDMG राज्य सचिव केंद्रीय नामनिर्देशित सदस्य उपविभागीय दक्षता समिती , ऍड.बापूसाहेब शीलवंत,गोविंद मोरे, जय माने, सुनील कांबळे यांनी शिबिर घेण्यासाठी मागणी केली होती. त्यानं नंतर तत्काळ 

शिबिरांमध्ये कोणकोणते तज्ञ डॉक्टर, त्यांचे सहकारी किती वेळ उपस्थित राहतील, ते स्पष्ट करण्यात यावे. उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या असशासकीय सदस्यांचा समन्वय राखून भाविकांना आवश्यक सहाय्य व उपचार मिळतील याची काळजी घ्यावी. आकस्मिक परिस्थितीसाठी रुग्णालयांनी १० टक्के खाटा राखून ठेवाव्यात आणि त्याविषयी लेखी माहिती संबंधितांना द्यावी, असे वैभव गीते यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

रुग्णालयातून कमीत कमी एक डॉक्टर किंवा कर्मचाऱ्याची नियुक्ती समन्वयक म्हणून करावी आणि त्यांचा संपर्क नंबर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलिसांनी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून अनुचित घटना उद्भवल्यास तातडीची कारवाई शक्य होईल.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेनेही या आरोग्य शिबिरांच्या अंमलबजावणीसाठी अंगीकृत रुग्णालयांशी बैठक घेण्याची विनंती केली असून, लागू न केल्यास आंदोलन छेडण्याची तयारी असल्याची सूचना दिली आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी रुग्णालये स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिक जबाबदारी 
याची अंमलबजावणी करून घेणे गरजेचे आहे.

सर्व संबंधितांना आरोग्य सेवा प्रभावीपणे देऊन आषाढी वारीत भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, अशी काटेकोर सूचना जिल्हा प्रशासकीय अधिकारी व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या उच्चपदस्थांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

फलटणमध्ये आ.दिपक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात ; तुतारीची माळ कोणाच्या गळ्यात ? चर्चांना उधान

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते