फलटण मधील बांधकाम कामगार एजन्सी दुकाने बंद करा 1रुपया फी हजारो रुपये घेण्याचे धंदे ... महादेव गायकवाड
मजूर वर्ग हा काम करून कष्ट करून पैसा यांच्या भूलथापांना यांच्या खादी कपड्यांना पाहून मजूर वर्ग घामाचा पैसा त्यांच्या खिशात भरत आहे. सर्वसामान्य नागरिक यांना बांधकाम कामगार या योजनेचा कोणत्याही स्वरूपातील माहिती नसल्याकारणाने हे बांधकाम कामगार संघटना कामगारांची लूट करत असल्याचे दिसत आहे कामगार संघटना आहेत परंतु कामगारांचे घामाचे पैसे खाणारे फलटण तालुक्यातून हटवा असे बोलले जात आहे आज पर्यंत फलटण मध्ये जेवढ्या बांधकाम कामगार संस्था आहेत यांच्या प्रत्येक पदाधिकारी किंवा ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगार मजूर यांना कार्ड दिले आहे अशा सर्व लोकांची चौकशी करणे गरजेचे आहे.
या संघटनांनी खरंच ते त्यांनी बांधकाम कामगार मजूर आहेत की काय कित्येकांच्या खात्यावरती पैसे सरकारी गेले आहेत हे खरच मजूर आहेत का हे देखील पाहणे गरजेचे आहे कमिशन पोटी या संघटनेच्या माध्यमातून सरकारी तिजोरीतील लाखो रुपये यांना अर्धे कमिशन आणि बाकी लोकांना अर्धे कमिशन असे झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे फलटण तालुक्यातील संघटना यांची चौकशी बांधकाम कामगार आयुक्त यांनी करावी
येत्या आठ दिवसात चौकशी झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसात आंदोलन करणार असल्याचे बोलले जात आहे
Comments
Post a Comment