फलटण - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या माध्यमातून १४ तारखेला फलटण येथे मेळावा घेण्यात आला त्या मध्ये आमदार दिपक चव्हाण आणि अजित पवार गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सोबत विविध मान्यवरांचा शरद पवार गटा मध्ये प्रवेश केला परंतु लोकांना अपेक्षित होते की पवारसाहेब फलटण कोरेगाव मतदार संघामध्ये आमदार घोषित करतील परंतु फलटण तालुक्यातील उमेदवारी चे वातावरण पहिल्या मुळे शरद पवार यांच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली नसल्याने फलटण कोरेगाव मतदार संघामध्ये चर्चेला वेगळेच उधाण येऊ लागले आहे. आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी अजित दादा गटाच्या माध्यमातून जाहीर केल्याने कदाचित पवार साहेब यांच्या मनामध्ये वेगळेच प्रश्न आलेत की काय अशा चर्चा सुरू आहेत. या मतदार संघात नवीन उमेदवाराला संधी मिळणार आहे की काय या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment